US San Francisco eSakal
ग्लोबल

US : "बोलण्याचं स्वातंत्र्य हे हिंसाचार करण्याचं लायसन्स नाही", अमेरिकेच्या खासदारांनी खलिस्तान समर्थकांना सुनावलं!

खलिस्तान समर्थकांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावास पेटवण्याचा प्रयत्न केला होता.

Sudesh

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरातील भारतीय दूतावासावर काही दिवसांपूर्वी खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता. यानंतर आता अमेरिकेतील खासदार आणि कित्येक भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी याविरोधात कठोर कारवाईचं आवाहन केलं आहे.

यावेळी भारतीय वंशाच्या अमेरिकी खासदारांनी खलिस्तान समर्थकांचा निषेध केला. "बोलण्याचं स्वातंत्र्य आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हिंसा भडकावण्याचं किंवा संपत्तीला नुकसान पोहोचवण्याचं लायसन्स मिळालं आहे." अशा शब्दांमध्ये या खासदारांनी खलिस्तान समर्थकांना इशारा दिला.

हिंसा सहन करणार नाही

गुरुवारी काँग्रेशनल कॉकस ऑन इंडिया या संघटनेचे सह अध्यक्ष रो खन्ना आणि मायकल वॉल्ट्झ यांनी हा इशारा दिला. भारतीय राजकीय अधिकारी, किंवा राजनैतिक सुविधांविरोधात होत असलेला हिंसाचार आपण सहन करणार नाही, असं ते म्हणाले.

"इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष म्हणून आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. यासोबतच, सोशल मीडियावर भारतीय राजदूत तरणजीतसिंग संधू आणि इतर अधिकाऱ्यांविषयी शेअर होत असलेल्या हिंसक आणि प्रक्षोभक पोस्टर्स आणि कंटेंटचा देखील आम्ही निषेध करतो. याप्रकरणी अमेरिका सरकारने तातडीने लक्ष घालून, दोषींवर कडक कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो." असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला बोलण्याचं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. तो त्यांचा अधिकारच आहे. मात्र याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला संपत्तीचे नुकसान करण्याची परवानगी मिळते. राजकीय संपत्ती किंवा अधिकाऱ्यांवर हल्ला हा फौजदारी गुन्हा आहे, आणि अशा प्रकारचं वर्तन सहन केलं जाणार नाही."

काय आहे प्रकरण

खलिस्तान समर्थकांनी रविवारी (२ जुलै) सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावास पेटवण्याचा प्रयत्न केला होता. सॅन फ्रान्सिस्को फायर डिपार्टमेंटने वेळीच कारवाई करत ही आग शमवली होती. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हाईट हाऊसने यावर निषेध व्यक्त केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीनंतर सुळेंचा कुमावतांना फोन; परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण

Dombivli Politics: 'मोदी भेटीतून प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा राजकीय मास्टरस्ट्रोक'; ठाण्यात भाजप-शिंदे गटात सूक्ष्म सत्तासंघर्ष..

MPSC Result: सर्व टप्पे पार करूनही यादीतून वगळले; ‘राज्यसेवा परीक्षा-२०२४’च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी

Shivraj Singh Chouhan : एक-दोन रुपये पीकविमा मिळणं ही थट्टा! अकोल्यातील शेतकऱ्याच्या तक्रारीची थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतली दखल...

आनंदाची बातमी! सोलापुरातील १९ विद्यार्थी झाले सीए; १०८ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा, राज्यात वाजताेय डंका..

SCROLL FOR NEXT