Emmanuel Macron 
ग्लोबल

France Election: फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांच्याकडून तडकाफडकी संसद विसर्जित; निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर

Emmanuel Macron News: फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रोन यांनी देशाची संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच देशात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रोन यांनी देशाची संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच देशात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. युरोपीयन युनियनच्या संसदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाच्या खराब कामगिरीनंतर मॅक्रोन यांनी हा निर्णय घेतलाय. सीएएनने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

एक्झीट पोलमध्ये कट्टर उजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅली पक्षाचा ३१.५ टक्के मतं घेऊन विजय होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही मतं मॅक्रोन यांच्या Renaissance Party ला मिळालेल्या मतांपेक्षा दुप्पट आहेत. मॅक्रोन यांच्या पक्षाला केवळ १५.२ टक्के मतं मिळाली आहेत. सोशलिस्ट पक्षाला १४.३ टक्के मतं मिळाली आहेत.

नॅशनल रॅली पक्षाचे नेते जॉर्डन बार्डेला यांनी फ्रान्स अध्यक्षांवर टीका केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या ईयूमधील पराभवामुळे त्यांनी विश्वास गमावलाय हे स्पष्ट आहे. इम्यॅन्यूएल मॅक्रोन यांचा काळ आता संपला आहे, असं ते म्हणाले. मॅक्रोन यांनी एक्झीट पोलनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांची घोषणा केली. फ्रान्समध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. ३० जून आणि ७ जुलै रोजी मतदान होईल.

मॅक्रोन म्हणाले की, 'माझा निर्णय धोकादायक आहे. पण, विश्वास महत्त्वाचा आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे. ते योग्य निर्णय घेतील हे मला माहिती आहे.' फ्रान्समध्ये ५७७ जागांसाठी कनिष्ठ सभागृहातील सदस्य निवडीसाठी मतदान होईल. फ्रान्समध्ये संसद आणि अध्यक्षपदाच्या वेगवेगळ्या निवडणुका होत असतात. त्यामुळे संसदेच्या निवडणुका होत असल्या तरी मॅक्रोन यांच्या पदाला कोणताही धोका नाही. २०२७ पर्यंत ते अध्यक्षपदावर कायम असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वेळापत्रकात बदल! तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचा समावेश; जाणून घ्या तारखा

Pune Nashik Railway Protest: पुणे–मंचर–नाशिक रेल्वेसाठी क्रांतीदिनी रास्ता रोको; अहिल्यानगर मार्गाच्या हालचालीविरोधात तीव्र संताप

Marathi News Live Updates : पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम येणार - भरणे

Nimgaon Mhalungi burglary: निमगाव म्हाळुंगीतील रणदिवे वस्तीमध्ये दिवसा घरफोडी; १० लाखांचा सोन्या-रोख ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीती

Farmer Electrocuted: मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे शेतातील मोटार सुरू करताना ३२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

SCROLL FOR NEXT