ecuador-jail ecuador-jail
ग्लोबल

इक्वेडोरच्या तुरुंगात टोळीयुध्दाचा थरार; 116 जणांचा मृत्यू

gang-battle-ecuador-jail

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जगभरातील ड्रग्ज गँगशी संबंधित कैदी असलेल्या या तुरुंगातील हिंसाचाराची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी आणि दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं जातंय. इक्वेडोरच्या ग्वायाक्विल या शहरातील तुरुंगात मंगळवारी (२८ सप्टेंबर) घडलेल्या या टोळीयुध्दात जवळपास पाच जणांचा शीरच्छेद करण्यात आला, तर इतरांना गोळ्या घालण्यात आल्या. आतापर्यंत 116 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कैद्यांनी एकमेकांवर ग्रेनेड फेकल्याचंही तेथील पोलीस कमांडर यांनी सांगितलं.

116 जणांचा मृत्यू, 80 हून अधिक कैदी जखमी

द लिटरल पेनिटेंटिअरी तुरुंगात घडलेली घटना ही देशातली आजवरची सर्वांत गंभीर आणि भयावह घटना ठरली आहे. तुरुंगावर ताबा मिळवण्यासाठी दोन गँगमध्ये होणाऱ्या टोळीयुद्धाच्या घटनांमधली ही आणखी एक घटना समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात अशाच प्रकारे तुरुंगातील टोळीयुद्धात 79 कैद्यांचा मृत्यू झाला होता. तुरुंगातील एका विंगमध्ये असलेल्या कैद्यांनी बोगद्याच्या माध्यमातून दुसऱ्या विंगमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी दोन्ही टोळ्यांनी एकमेकांवर हल्ला केला. यात सुमारे 80 हून अधिक कैदी जखमी झाले आहेत. ही धुमश्चक्री सुरू असलेल्या विंगमध्ये सहा आचारी अडकलेले होते. पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

आणीबाणी जाहीर

राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी देशातील तुरुंग यंत्रणेमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. द लिटरल पेनिटेंटिअरी तुरुंगात लॉस कोनरॉस या युरोपियन टोळीतील कैदी आहेत. या टोळीचे संबंध मेक्सिकोमधील शक्तीशाली ड्रग्ज तस्कर टोळी सिनालोआशी आहेत. तर जॅलिस्को न्यू जनरेशन कार्टल (CJNG) ही मेक्सिकोतील गुन्हेगारांची टोळीदेखील इक्वाडोरमधील टोळ्यांशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहे. इक्वाडोर ते मध्य अमेरिकेपर्यंतच्या तस्करीच्या मार्गावर ताबा मिळवण्यासाठी ते हा प्रयत्न करतायत. सध्या सिनालोआ टोळीचा याठिकाणी ताबा आहे.

तुरुंगामध्ये हे टोळीयुद्ध भडकले

जुलैमध्ये राष्ट्राध्यक्ष लासो यांनी इक्वेडोरमध्ये तुरुंग क्षमतेपेक्षा 30 टक्के अधिक भरलेले असल्याचं म्हटलं होतं. तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी ज्या कैद्यांनी त्यांची बहुतांश शिक्षा पूर्ण केली आहे किंवा किरकोळ गुन्हे असतील त्यांना सोडण्याचा विचार असल्याचं जाहीर केलं होतं. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 400 पोलिसांची मदत घ्यावी लागली. सध्या इक्वेडोरमध्ये कार्यरत असलेल्या मेक्सिकोच्या ड्रग तस्कर टोळ्यांच्या आदेशावरून तुरुंगामध्ये हे टोळीयुद्ध भडकल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे. तुरुंगात निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भयावह होती, असं तुरुंग संचालक बोलिव्हर गारझॉन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

पूर्णपणे नियंत्रण मिळवलं

"काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर रात्री पुन्हा एकदा गोळीबार आणि स्फोट झाले. त्यानंतर सकाळी आम्ही याठिकाणी पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. नेमका वाद झाला त्याठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत. याठिकाणी आणखी मृतदेह मिळाले असं, ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून विसर्ग वाढविला, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT