Donald-Trump
Donald-Trump 
ग्लोबल

अमेरिकेतील हिंसाचार थांबला नाहीतर...; ट्रम्प यांची धमकी

यूएनआय

वॉशिंग्टन - जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. यामुळे अमेरिकेमध्ये  आंदोलनाचा भडका उडाला असून लोक उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. तसेच अमेरिकेतील अनेक भागात या मुद्द्यावरुन हिंसाचार उसळला आहे. अनेक ठिकाणी दुकाणे लुटणे, गाड्यांची जाळपोळ आणि इमारतींवर दगडफेक अशा घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसाचार थांबला नाही तर सैन्य तैनात करण्याची धमकी दिली आहे. राज्यांनी हिंसाचार थांबवण्यास नकार दिला तर अमेरिकी सैन्य तैनात केले जाईल, जेणे करुन अधिकारी, संपत्ती आणि जीवांचे संरक्षण होईल, असं ट्रम्प म्हणाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये हिंसाचार उसळला आहे.  या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी राज्याच्या गव्हर्नरांना हिंसा थांबवण्याचे आव्हान केले आहे. गव्हर्नरांनी हिंसा थांबवण्यासाठी राष्ट्रीय गार्ड यांना तैनात करायला हवे आणि जर त्यांनी असं करण्यास नकार दिला तर सैना तैनात करावी लागेल, असं ट्रम्प म्हणाले आहेत. हिंसेवर नियंत्रण मिळवण्यासाठी गव्हर्नर आणि महापौरांनी कायद्याचे पालन करायला हवे. जर कोणते शहर किंवा राज्य अमेरिकी नागरिकांचा जीव आणि संपत्ती वाचवण्यास नकार देत असेल तर अमेरिकी सैना तैनात करावी लागेल. त्याने सर्व समस्या सुटतील, असंही ते म्हणाले आहेत. 

फ्लॉईड यांच्या मृत्यूमुळे आंदोलनाचा पेटलेला वणवा वाढताना दिसत आहे. अनेकांनी तीव्र आंदोलन सुरु केले आहे. अमेरिकेतील 140 शहरांमध्ये या घटनेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. विशेष म्हणजे आंदोलनात गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय अशा दोन्ही लोकांनी सहभाग घेतला आहे.

जॉर्ड फ्लॉईड यांच्या मृत्यूविरोधात शुक्रवारी शेकडोच्या संख्येने आंदोलनकर्ते व्हाईट हाऊसच्या बाहेर जमा झाले होते. आंदोलनकर्त्यांचा आवेश लक्षात घेत सुरक्षा अधिकाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी रवानगी अंडरग्राऊंड बंकरमध्ये केली होते. आंदोलन शनिवार आणि रविवारीही सुरुच होते. त्यांनतर व्हाईट हाऊसकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. रस्त्यावर जी अराजकता दिसत आहे ती कधीही सहन केली जाणार नाही, असं ट्रम्प यांच्या वतीने या व्हिडीओमध्ये म्हणण्यात आलं आहे.

अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलिस कस्टडीदरम्यान मृत्यू झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अमेरिकेमध्ये संतापाची लाट पसरली असून देशात हिंसक प्रदर्शन होत आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला शांततेत सुरु असणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक रस्त्यावर उतरत असल्याचं दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT