हिवाळ्यात युरोपमध्ये स्कीईंग करण्याची परंपरा आहे. (संग्रहीत) 
ग्लोबल

जर्मनीला हवी स्की रिसॉर्टवर बंदी - अँजेला मर्केल

यूएनआय

बर्लिन - हिवाळ्याबरोबरच कोरोनाची दुसरी लाट आली असताना युरोपमध्ये स्की रिसॉर्ट बंद करावेत अशी भूमिका जर्मनीने घेतली आहे. ऑस्ट्रिया या शेजारी देशाबरोबरील करार मात्र अवघड ठरला असल्याचे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मर्केल यांनी संसदेत निवेदन केले. त्या म्हणाल्या की, स्की मोसम जवळ आला आहे. सर्व स्की रिसॉर्ट बंद ठेवता यावीत म्हणून आम्ही युरोपमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करू. ऑस्ट्रीयाबाबत पुन्हा प्रयत्न केले जातील.

पहिल्या लाटेत जर्मनीत आढळलेले अनेक रुग्ण इश्कल या ऑस्ट्रीयातील स्की रिसॉर्टशी संबंधित होते. यामुळे ऑस्ट्रीया, इटली, स्वित्झर्लंड येथील लोकप्रिय स्की विभागांत प्रवास करू नये असा इशाराच जर्मनीने जारी केला.

महत्त्वाचे मुद्दे

  • अतीउंच प्रदेशांतील लिफ्ट बंद ठेवण्याचा फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया व जर्मनीचा आदेश
  • हिवाळ्याच्या प्रारंभी ही खबरदारी घेतल्यास संसर्ग आटोक्यात आल्यानंतर मोसम भरात येईल तेव्हा सर्वच रिसॉर्ट चालकांना फायदा होण्याची अपेक्षा
  • ऑस्ट्रीयातील देशव्यापी लॉकडाउन सात डिसेंबरला उठणार
  • स्की क्षेत्राबाबत काय निर्णय होणार हे अद्याप अस्पष्ट
  • युरोपच्या सामायिक निर्बंधांबाबत ऑस्ट्रीयाचा ठंडा प्रतिसाद
  • ऑस्ट्रीयातील परदेशी पर्यटकांमध्ये जर्मनीच सर्वांत मोठा वाटा
  • नव्या वर्षापर्यंत सर्व स्की क्षेत्र बंद मर्यादेत ठेवण्याचा फ्रान्सचा दंडक
  • युरोपीय महासंघाचा घटक नसलेल्या स्वित्झर्लंडमधील स्की रिसॉर्टवर जवळपास नेहमीसारखी स्थिती

इटलीच्या पंतप्रधानांचा इशारा
नाताळच्या सुटीत लोकांनी स्कीईंग करू नये. त्यामुळे दुसरी लाट रोखता येईल, असे इटलीचे पंतप्रधान ज्युसेप्पे काँटे यांनी नुकतेच सांगितले. युरोपने सामायिक नियमांना सहमती दर्शवावी. इटलीने आपले स्की क्षेत्र बंद ठेवले तर परदेशांतून  रुग्ण येण्यास प्रतिबंध होईल, असेही ते म्हणाले.

युरोपीय महासंघाने स्कीईंग क्षेत्र बंद ठेवले तर दोन अब्ज युरो नुकसान होईल, ज्याची महासंघाने भरपाई द्यायला हवी.
- जेर्नोट ब्लुमेल, ऑस्ट्रियाचे अर्थ मंत्री

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT