Russia Ukraine War Sakal
ग्लोबल

युक्रेनच्या मदतीला बकरी आली धावून; रशियाचे ४० सैनिक गंभीर जखमी

यापूर्वी एका कुत्र्यानेही युक्रेनला रशियाविरुद्धच्या युद्धात मदत केली होती.

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला आता जवळपास चार महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला आहे. या युद्धाची तीव्रता कमी होण्याचं नावच घेत नाहीये. अशातच आता या युद्धात एका बकरीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या बकरीमुळे रशियाचे ४० सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर या बकरीला गोट ऑफ कीव असं संबोधलं जातंय. (Russia Ukraine War news)

या बकरीला गोट ऑफ कीव (Goat of Kyiv) म्हणण्याचं कारण म्हणजे युक्रेनचा गुप्तचर यंत्रणेचा पायलट घोस्ट ऑफ कीव (Ghost of kyiv). त्याने युद्धादरम्यान रशियाच्या विमानांवर हल्ला चढवत हरवलं होतं. या बकरीआधी एका कुत्र्यानेही युक्रेनला रशियाविरोधातल्या युद्धात मदत केली आहे. याआधी जॅक रसल या कुत्र्याने युद्धादरम्यान २०० हून अधिक स्फोटकं शोधून काढत युक्रेनी सैन्याची मदत केली होती.

काय केलं या बकरीने?

रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आता पाचव्या महिन्यात पोहोचलं आहे. या दरम्यान रशियन सैन्याने दक्षिण पूर्व युक्रेनमधल्या जापोरिजिया ओब्लास्ट मधल्या रोजडोरी गावात एक ग्रेनेड ट्रॅप लावला होता. एका हॉस्पिटलच्या चारही बाजूंनी तारा लावण्यात आल्या होत्या. या दरम्यान एक बकरी तिथे गेली आणि तारांना तिचा स्पर्श झाल्याने हे ग्रेनेड फुटले. या स्फोटामध्ये कमीत कमी ४० रशियन सैनिक गंभीर जखमी झाले.

युक्रेनच्या (Ukraine News) गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, बकरीच्या हालचालींमुळे अनेक ग्रेनेड्सचा स्फोट झाला आणि रशियाच्या सैनिकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. ही बकरी या स्फोटामधून वाचू शकली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

SCROLL FOR NEXT