Google says that the majority of its employees will work from home until 2021 
ग्लोबल

खूशखबर ! वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी 'या' कंपनीने घेतला मोठा निर्णय

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जग लॉकाऊन असताना गुगलने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या वर्षी प्रत्यक्ष कार्यालयामध्ये उपस्थित राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सर्वच कंपन्या प्रयत्न करत असताना गुगलनेही काही निर्णय घेतले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये मर्यादित कर्मचाऱ्यांना रोटेटिंग पद्धतीने आळीपाळीने कामावर बोलवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तसेच, मे महिन्याच्या सुरुवातीलाच गुगलनेही आपल्या कर्मचाऱ्यांना २०२० संपेपर्यंत घरुन काम करण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पिचाई यांनी ज्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणं शक्य आहे त्यांनी २०२० संपेपर्यंत सध्या सुरु आहे त्याप्रमाणे घरुनच काम करावे असं सांगितलं आहे. आधी कंपनीने कर्मचारी १ जूनपर्यंत घरुन काम करतील असं म्हटलं होतं. ऑनसाईट काम कऱणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनी जून किंवा जुलैमध्ये आपली कार्यालये सुरु करणार असल्याचेही पिचाई यांनी यावेळी स्पष्ट केले होते. 
------------
आरबीआय बॉँड्समध्ये गुंतवणूक करायची आहे? मग ही आहे शेवटची संधी...
------------
सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण
------------
...तर सोशल मीडिया कंपन्या बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
------------
लोकांनी थेट एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून कार्यालयामधील व्यवस्थापनासंदर्भात कंपनी अतिरिक्त काळजी घेणार असल्याचेही पिचाई म्हणाले होते. गुगलने मंगळवारी कंपनीची जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये असणारी कार्यायले सुरु करण्यासंदर्भातील माहिती दिली. १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ६ जुलैपासून कार्यालये सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सप्टेंबरपर्यंत कर्मचारी संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच घरुन काम करणाऱ्यांसाठीही कंपनीने विशेष घोषणा केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता. घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुगलने एक हजार डॉलर किंवा या मुल्या इतका निधी प्रत्येक देशात घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. घरुन काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मग अगदी इलेक्ट्रीक गॅजेट्सपासून ते फर्निचरपर्यंतच्या गोष्टी घेण्यासाठी हा निधी देण्यात येणार असल्याचे गुगलनं म्हटलं आहे. २०२० वर्ष संपेपर्यंत अनेक कर्मचारी घरुन काम करण्याची शक्यता अधिक असल्याने हा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

Latest Marathi News Live Update : सोलापुरात एसटी बसचा भीषण अपघात

Maharashtra Fisheries : पर्ससीन, एलईडी मासेमारीची एसआयटीमार्फत चौकशी करा; पारंपरिक मच्छिमार संरक्षण समितीची मागणी!

Pune News : महापालिकेने केली इमारत पाडकामासाठी नियमावली

SCROLL FOR NEXT