Google 
ग्लोबल

सर्च इंजिन काढून घेऊ; ‘गुगल’ने दिला ऑस्ट्रेलियाला इशारा

पीटीआय

वेलिंग्टन - वृत्तसंस्थांवरील माहितीसाठी पैसे भरण्यास ऑस्ट्रेलिया सरकारने भाग पाडल्यास या देशाला आपले सर्च इंजिन उपलब्ध करून देणार नाही, असा धमकीवजा इशारा ‘गुगल’ने ऑस्ट्रेलियाला दिला आहे. ऑस्ट्रेलियानेही तातडीने प्रत्युत्तर देताना ‘आम्ही धमक्यांना भीक घालत नाही,’ असे सुनावले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुगल अथवा इतर कोणत्याही सोशल मीडिया कंपनीने ऑस्ट्रेलियातील वृत्त वाहिन्यांवरील मजकूर वापरल्यास त्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतील, असा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला असून तसे विधेयकही मांडले आहे. यासाठी सरकारने नियमावलीही तयार केली असून गुगलने लिंक किंवा स्निपेट्‌सचा वापर केला तरी त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. या नियमांना गुगलचा विरोध आहे. याबाबत आज संसदीय समितीच्या चौकशीवेळी बोलताना ‘गुगल’च्या विभागीय संचालिका मेल सिल्वा यांनी कंपनीची भूमिका मांडली.

‘ऑस्ट्रेलियाचे नवे नियम पाळणे शक्य नाही. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले तर ऑस्ट्रेलियात गुगल सर्च इंजिन बंद करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय राहणार नाही. हे आमच्यासाठी आणि येथील नागरिकांसाठीही तोट्याचे आहे. अनेक लोक आमच्या ऑनलाइन व्यासपीठाचा उपयोग करून छोटे उद्योग चालवितात. ऑस्ट्रेलियातील वृत्तसंस्थांना त्यांनी तयार केलेल्या बातम्या आणि इतर मजकूरासाठी त्यांच्या संकेतस्थळांद्वारे पैसे मिळतात. तरीही याच मजकूरासाठी आम्ही त्यांना आणखी पैसे द्यावे, असे सरकारला वाटते,’’ असे सिल्वा यांनी समितीसमोर सांगितले. फेसबुकनेही ऑस्ट्रेलियाच्या नियमांना विरोध केला आहे. 

ऑस्ट्रेलियाचे म्हणणे
‘गुगल’च्या इशाऱ्याला पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही आमच्या जागेत काय करणार याचा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकार घेणार, आमची संसद घेणार. ऑस्ट्रेलियात कामकाज असेच चालते, असे मॉरिसन यांनी स्पष्ट केले. येथील अनेक संस्थांनीही, सरकारने आपल्या भूमिकेवर ठाम रहावे, असा आग्रह धरला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोन्या चांदीला झळाळी ते इंधन पुरवठा सुरळीत! युद्धविरामाचा भारताला काय होणार फायदा?

IPL 2026: वैभव सूर्यवंशी भविष्यातील मुंबई इंडियन्सचा खेळाडू... RR vs MI सामन्यानंतर कोणी केला हा दावा? कसं आहे शक्य?

दीपिकाने धर्म बदलून केलेलं दुसरं लग्न; आता मुलाला नमाज शिकवत आहे अभिनेत्री, भावूक होत म्हणते....

ओमानमध्ये ड्रोन हल्ल्यात मृत्यू, शरीराचे तुकडे; DNA टेस्ट करून पार्थिव कुटुंबाकडे द्या; मुंबई हायकोर्टाचे DDGPला आदेश

Latest Marathi News Live Update: लातूरमध्ये मद्यधुंद दुचाकीस्वाराने लहान मुलाला उडवले; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

SCROLL FOR NEXT