Sikandar Death Mystery esakal
ग्लोबल

Sikandar Death Mystery : खरंच सिकंदरचा मृत्यू प्रेयसीने घात केल्याने झाला? नेमकं खरं काय, जाणून घ्या

डझनहून अधिक देश जिंकण्याबरोबरच त्याने अनेक शहरांचा पायाही घातला.

सकाळ डिजिटल टीम

Great Sikandar Death Mystery : अलेक्झांडर द ग्रेट आणि शक्तिशाली लष्करी कमांडर, इतिहासात अलेक्झांडरला अनेक नावे दिली गेली आहेत. त्याच्या प्रत्येक नावात महान शब्द जोडला गेला कारण त्याने अगदी लहान वयात आपल्या राज्याचा युरोप ते आशियापर्यंत विस्तार केला. ईसापूर्व 356 मध्ये मॅसेडोनियाच्या राजघराण्यात जन्मलेल्या अलेक्झांडरचे साम्राज्य सीरिया, इराण, इजिप्त, इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि ग्रीसपासून तुर्कस्तानपर्यंत पसरले होते. डझनहून अधिक देश जिंकण्याबरोबरच त्याने अनेक शहरांचा पायाही घातला.

अलेक्झांडरला केवळ जग जिंकण्याची हौस नव्हती, तर त्याने सुदूर समुद्र पाहण्याचा संकल्प केला होता. अलेक्झांडरच्या मृत्यूची कहाणी रंजक आहे, पण त्याचे सत्य काही वेगळच होतं.

समुद्राची खोली पाहणारा पहिला माणूस

असं म्हणतात की, अलेक्झांडर हा जगातील पहिला माणूस होता जो समुद्राच्या खोलवर गेला होता. त्याच्या समुद्राशी असलेल्या आसक्तीमागे अनेक कारणं सांगितली गेली. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, त्याच्या मनात समुद्र समजून घेण्याची प्रचंड उत्सुकता होती.

त्याचवेळी, काही जण म्हणतात की समुद्रापर्यंत पोहोचणं हा त्याच्या लष्करी रणनीतीचा एक भाग होता. ज्याद्वारे त्याला युद्धनीती आणखी शक्तिशाली बनवायची होती. अ‍ॅरिस्टॉटल, ज्याला अलेक्झांडरचा गुरू म्हटलं जातं, त्यांनी पाणबुडी अलेक्झांडरशी संबंधित असल्याचं सांगितलं होतं.

प्रेयसीकडून फसवणूक झाली का?

अलेक्झांडरच्या समुद्री पराक्रमाचा एक किस्सा मनोरंजक आहे. एकदा अलेक्झांडरने समुद्राच्या खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी काचेच्या एका मोठ्या भांड्याचा वापर केला. या भांड्याच्या आतापर्यंत पाणी पोहोचणं कठीण होतं.

अलेक्झांडर त्या भांड्यात बकरी, कुत्रा आणि मांजर घेऊन बसला होता. त्याला बाहेरचं सगळं दृश्य दिसत होतं. ते बंद काचेच भांड एका साखळीला जोडल होतं जेणेकरून त्याच्या मदतीने तो पाण्यातून बाहेर येऊ शकेल.

अलेक्झांडरची इच्छा होती की त्याच्या साखळ्या अशा विश्वसनीय हातात असाव्यात ज्यामुळे त्याला बाहेर काढता येईल. त्यामुळेच त्याने प्रेयसीच्या हातात त्या साखळ्या दिल्या आणि तो समुद्रात गेला.

सिकंदर पाण्यात पोहोचल्यानंतर त्याच्या प्रेयसीने ते साखळदंड पाण्यात सोडले आणि तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत पळून गेली. पण अलेक्झांडरने शौर्य दाखवत पाण्यातून सुखरूप बाहेर आला.

म्हणूनच बनवलेलं काचेचं भांड

ट्रॉयच्या युद्धाच्या वेळी अलेक्झांडरने एक विशेष प्रकारची बरणी बनवल्याचा उल्लेख मध्ययुगीन हस्तलिखितांमध्ये आढळतो. ज्याच्या मदतीने तो काही वेळ पाण्यात शिरायचा आणि न भिजता परत यायचा. याच बरणीच्या साहाय्याने त्याने सागरी मार्गाने ट्रॉय बेटावर चढाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

Pune Bhavani Peth Crime News: भवानी पेठेत पूर्ववैमनस्यातून १८ वर्षीय तरुणाचा खून; खडक पोलिसांकडून चौघांना अटक

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

SCROLL FOR NEXT