greta thunberg india farmers protest 
ग्लोबल

घाबरत नाही! दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर ग्रेटाचं पुन्हा ट्विट

सकाळ डिजिटल टीम

स्टॉकहोम - पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. कृषी कायद्याविरोधात ग्रेटाने केलेल्या ट्विटवरून एफआयआर दाखल करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाने 153A आणि 120B अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल केल्यानंतरही ग्रेटाने प्रतिक्रिया दिली आहे. तिने आणखी एक ट्विट करून आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. त्या ट्विटमध्ये तिने पुन्हा म्हटलं की, मी अजुनही शेतकऱ्यांना पाठिंबा देते. त्यांच्या शांततेने सुरु असलेल्या आंदोलनाचं समर्थन करते. तिरस्काराने, धमकी देऊन किंवा मानवाधिकाराचे उल्लंघन करून हे बदलता येणार नाही. #FarmerProtest

ग्रेटाने केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते. तिनं ट्विट करताना म्हटलं होतं की, आम्ही भारतातील शेतकरी आंदोलकांसोबत उभा आहोत. ग्रेटाच्या या ट्विटनंतर भारत सरकारने स्पष्ट शब्दात सविस्तर असं उत्तर दिलं होतं. 

दरम्यान, त्याआधी ग्रेटाने एक ट्विट डिलिट केल्यानं तिच्याविरोधात सोशल मीडियावर बरीच उलट सुलट चर्चा रंगली होती. ग्रेटाने पहिल्या ट्विटमध्ये स्ट्राइक टूल किटचे डॉक्युमेंट शेअर केले होते. यामध्ये 26 जानेवारीला गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याची तयारी आधीपासूनच केली जात होती असा आरोप कपिल मिश्रा यांनी केला आहे. ग्रेटाने शेअर केलेल्या डॉक्युमेंटचं नाव 'ग्लोबल फार्मर्स स्ट्राईक- फर्स्ट वेव्ह' असं होतं. यामध्ये आंदोलनाच्या शेड्युलबद्दलची माहिती देण्यात आली होती. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाबाबत वक्तव्य केल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनीही भूमिका मांडली आहे. यामध्ये शेतकरी आंदोलन आहा आमचा अंतर्गत प्रश्न आहे अशी उत्तरे अनेक भारतीय सेलिब्रिटींनी दिली आहेत. यामुळे काही सेलिब्रिटी ट्रोलही झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT