grilfriend propose to boyfriend and gifting him a bmw car and house
grilfriend propose to boyfriend and gifting him a bmw car and house 
ग्लोबल

प्रियकराचे नशीबच जोरात; सगळीकडून मालामाल...

वृत्तसंस्था

बीजिंग (चीन): प्रियकराचे नशीब आहे की काय? आमचे नशीब कुठे लपलेय काय माहिती. गर्लफ्रेण्ड मिळायलाही नशीब लागते. गर्लफ्रेण्ड बरोबर त्याला काय-काय मिळाले, या आहेत एका व्हिडिओवरील प्रतिक्रिया.

एका युवतीने प्रियकराला प्रपोज करताना बीएमडब्ल्यू मोटार व घर गिफ्ट दिले आहे. प्रियकराचा फक्त मला साथ हवी आहे, असे प्रेयसीने म्हटले आहे. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. संबंधित जोडपे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. शाओजींग आणि शाओक अशी त्यांची नावे आहेत.

Video: हॅलो, संजना बोलतेय; अन् तिथचं फसला...

शाओजींग आणि शाओकची एक वर्षापूर्वी एका मॉलमध्ये भेट झाली होती. त्यावेळी शाओकने शाओजींगला प्रपोज केले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे शाओजींग प्रियकराला मॉलमध्ये घेऊन गेली. प्रपोज केलेल्या ठिकाणी त्याला एक फुलांचा पुष्पगुच्छ भेट दिला. या पुष्पगुच्छामध्ये बीएमडब्ल्यू मोटारीची चावी होती. शिवाय, घरही त्याला भेट म्हणून दिले. यावेळी परिसर सजविण्यात आला होता. शिवाय, दोघांचे मित्रही उपस्थित होते.

बास, मी आता जगूच शकत नाही...

शाओजींग म्हणाला, 'माझ्या प्रियकराने माझ्यासाठी जो त्याग केला आहे तो खूप खास आहे. मी,  त्याला काय देऊ शकते असा विचार केला. त्यावेळी मी त्याला मोटार आणि घर भेट देण्याचे ठरवले. अर्थात, भेटवस्तू कुटुंबियांकडूनच घेतल्या आहेत. फक्त मला आयुष्यभर त्याची सोबत हवी आहे.'

पत्नी म्हणाली, तू फक्त नावाला नवरा म्हणून राहा...

दरम्यान, प्रेयसीने केलेल्या भन्नाट प्रपोजमुळे प्रियकर भावूक झाला. त्याने तिला विवाहासाठी होकार दिला. प्रेयसीने केलेल्या लग्नाच्या मागणीचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

दोन मित्र अऩ् एक मैत्रिण; तर मैत्रिण कोणाची?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT