2023 Israel–Hamas war  sakal
ग्लोबल

Hamas-Israel War: ३ महिन्यात तब्बल ४ हजार विद्यार्थ्यांचा झाला मृत्यू ; ३८१ शाळा उद्वस्त

सकाळ डिजिटल टीम

2023 Israel–Hamas war: इस्राईल आणि हमास संघर्षाला ८८ दिवस पूर्ण झालेले असताना गाझा पट्टीवरील इस्त्राईलच्या हल्ल्यात आतापर्यंत ४ हजार १५६ विद्यार्थी मारले गेल्याचा दावा पॅलेस्टाईनच्या शिक्षण मंत्रालयाने केला आहे. तर ३८१ शाळा नष्ट झाल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

गेल्या चोवीस तासांत इस्त्राईलच्या हल्ल्यात २०७ पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. दरम्यान, इस्राईलने सीरिया आणि लेबनॉनमध्ये हल्ले केले असून या हल्ल्याला दुजोरा दिल्याचे 'अल जझिरा' ने म्हटले आहे.

नोव्हेंबरपर्यंत ३ हजार विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते आणि आता डिसेबरखेरपर्यंत हा आकडा चार हजारापर्यंत गेल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, मध्य गाझा पट्टी आणि दीर अल बलाह शहरावर इस्राईलने केलेल्या हवाई हल्ल्यात पंधरा पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आणि अनेक जखमी झाले. इस्राईलने निर्वासित नागरिक राहत असलेल्या एका घराला टार्गेट केले.

गाझा पट्टी (७ ऑक्टोबरपासून)

मृत २२,१८५

जखमी ५७,०३५

व्याप्त पश्चिम किनारपट्टी

मृत ३२४

जखमी ३८००

इस्त्राईल

मृत १,१३९

जखमी ९६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT