harry potters author jk rowling says she has recovered from covid 19 and shares breathing technique with fans 
ग्लोबल

'हॅरी पॉटर'च्या लेखिकेने सांगितला कोरोनावर उपाय...

वृत्तसंस्था

लंडनः कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पण, 'हॅरी पॉटर'ची लेखिका जे. के. रोलिंग यांनाही कोरोनाची लागण झाली होती. दोन आठवड्यानंतर त्या ठणठणीत झाल्या आहेत. यावर त्यांनी उपाय सांगितला असून, व्हिडिओ व्हायरल केला आहे.

जे. के. रोलिंग यांनी दोन आठवड्यांच्या आयसोलेशननंतर ठणठणीत झाल्याचे सांगताना व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एका विशिष्ट व्यायामामुळे बरी झाल्याचा दावा केला आहे. व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, एका डॉक्टरने या विशिष्ट व्यायामाबद्दल सल्ला दिला आहे. दोन आठवड्यांपासून माझ्यात कोरोनाची लक्षणे दिसत होती. मी हा व्यायाम केला आणि माझ्यातील लक्षणे दूर झालीत. हे करायला एकही पैसा लागत नाही. पण हे तंत्र तुमच्या प्रिय व्यक्तिंच्या फायद्याचे ठरू शकते.' जे के रोलिंग यांचा हा व्हिडीओ अभिनेत्री ट्विंकल खन्नाने शेअर केला आहे.

जे. के. रोलिंग यांच्याविषयी...
जे. के. रोलिंग या एक ब्रिटिश लेखिका आहेत. हॅरी पॉटर या काल्पनिक व्यक्तिरेखेशी निगडित कादंब-यांची मालिका इंग्रजी साहित्यक्षेत्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. इ.स. १९९० साली मँचेस्टर ते लंडन या रेल्वेप्रवासात या मालिकेची कल्पना सुचल्याचे त्यांनी म्हटले जाते. हॅरी पॉटर पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या जवळपास ४० कोटी प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत. शिवाय, त्यावर आधारित चित्रपटदेखील लोकप्रिय ठरले आहेत. हॅरी पॉटर पुस्तकांच्या विक्रीमुळे त्या पाच वर्षांत श्रीमंत बनल्या. मार्च इ.स. २०१० सालातल्या फोर्बसच्या कोट्यधीशांच्या यादीत जे.के. रोलिंग यांनी स्थान मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

Balwan Punia: ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या यशामागचा आधारस्तंभ हरपला! वडील बलवान पुनिया यांचे निधन

SCROLL FOR NEXT