Ultrasound-Test 
ग्लोबल

अवकाशस्थानकात पृथ्वीवरून उपचार

पीटीआय

न्यूयॉर्क - अवकाशातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर काम करणाऱ्या एका अंतराळवीराच्या मानेशेजारील वाहिनीमध्ये तयार झालेली रक्ताची गाठ पृथ्वीवरील शास्त्रज्ञांनी शोधून काढून त्यावर यशस्वीरीत्या उपचारही केले. अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. यामुळे भविष्यात चंद्र आणि मंगळावरील अंतराळ मोहिमांची आखणी करताना संशोधन संस्थांना याचा उपयोग होईल. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’ या नियतकालिकामध्ये या संदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

अवकाशस्थानाकावर काम करणाऱ्या अंतराळवीराच्या मानेच्या वाहिन्यांची रचना आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा संशोधकांनी अभ्यास केला होता, यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे दिसून आले. एका अंतराळवीराच्या मानेच्या शिरेतून ऑक्‍सिजनरहित रक्त पुन्हा मेंदूंकडून हृदयाकडे जात असल्याचे आढळून आले. अमेरिकेतील ल्युसियाना स्टेट युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी अकरा अंतराळवीरांची पाहणी केली होती, यामध्ये रक्तवाहिन्यांसंदर्भातील पाहणीचाही समावेश होता. गुरुत्वाकर्षणरहित स्थितीमध्ये मानवी शरीरात कशा पद्धतीने रक्ताचे वहन होते, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न या संशोधकांनी केला.

अल्ट्रासाउंड चाचण्या
प्रत्यक्ष मोहिमेच्या निर्धारित वेळेमध्ये पृथ्वीवरील शास्त्रज्ञांनी अंतराळवीरांच्या मानेशेजारील अंतर्गत रक्तवाहिन्यांच्या अल्ट्रासाउंड चाचण्या घेतल्या. जवळपास दोन महिने ही प्रक्रिया सुरू होती, यामध्ये एका अंतराळवीराच्या मानेच्या डावीकडील रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे अंतराळवीरांचे दैनंदिन काम सुरू असतानाच त्यांना पृथ्वीवरील दोन स्वतंत्र रेडिओलॉजिस्टकडून मार्गदर्शन करण्यात आले, तसेच त्यांनीच या अंतराळवीराच्या अल्ट्रासाउंड चाचण्याही घेतल्या.

‘इनॉक्‍सपारिन’चा वापर
नासाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग होता, वैद्यकीय संशोधकांनी यावर बराच काथ्याकूट करून संबंधित अंतराळवीरावरील उपचाराची पद्धत निश्‍चित केली. हा प्रसंग उद्‌भवला तेव्हा अंतराळ स्थानकातील वैद्यक कक्षामध्ये २० छोट्या बाटल्यांमध्ये तीनशे मिलीग्रॅम एवढेच इनॉक्‍सापारिन हे औषध होते, ते  इंजेक्‍शनद्वारे घेता येते, यामुळे रक्त पातळ होते; पण रक्तातील अडथळा दूर करणारे औषध मात्र त्यांच्याकडे नव्हते. यानंतर अंतराळवीरांनी इनॉक्‍सापारिनच्या माध्यमातून उपचार सुरू केले. सुरुवातीला याचे जास्त डोस घेण्यात आले; पण नंतर मात्र क्रमाने हे प्रमाण घटविण्यात आले. यामुळे गाठीचा आकार कमी होत गेला. हा अंतराळवीर पृथ्वीवर आल्यानंतर रक्तामध्ये कुठलीही गाठ शिल्लक राहिली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

Raigad Safety Row: कुंभे धबधब्यातील प्रतिबंधित सुळक्याचे रील एमटीडीसीच्या पेजवर

Pulse Polio : मुळशीसह पुणे जिल्ह्यात २८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; जन्मापासून पाच वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला ‘दोन थेंब जीवनाचे’ देण्याचे आवाहन

MPSC Main Exam Pattern: राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल; वैकल्पिक विषय वगळला, पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT