Sri Lanka financial crisis  sakal
ग्लोबल

Crises In Sri Lanka : श्रीलंकेतील भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर जारी

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक हिंसक होत चालली आहे. त्यात पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे (Mahindra Rajpakshe) यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला आहे. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी हिंसक झालेल्या आंदोलकांनी (Protest) नेत्यांची घरेदेखील पेटवून दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस हिंसक होत चाललेल्या परिस्थितीनंतर श्रीलंकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. (Sri Lanka Crises News)

भारत सरकारकडून श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षितेसाठी (Indians In Sri Lanka) श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील भारतीय दूतावासाचा हेल्पलाइन क्रमांक आणि मेल आयडी जारी केला आहे. भारताच्या सागरी सीमेवर असलेल्या श्रीलंकेत मोठ्या संख्येने दक्षिण भारतीय लोक राहतात मात्र, पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर उसळलेल्या हिंसक घटनामुळे भारतातील अनेक कुटुंबियांनी श्रीलंकेत अडकलेल्या प्रियजनांबाबत काळजी व्यक्त करण्यास सुरू केली आहे.

श्रीलंकेतील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ईमेल

श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक भारत सरकारने जारी केले आहेत. तसेच तेथील परिस्थितीवर भारत सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले असून, श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांनी +94-773727832 या हेल्पलाइन क्रमांकावर आणि कोलंबोतील भारतीय दूतावासाच्या cons.colombo@mea.gov.in मेल आयडीवर संपर्क करावा असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

Jio New Recharge : जिओची धमाकेदार ऑफर! 'या' रिचार्जमध्ये मिळणार Netflix-Amazon सारखे 15 OTT ॲप्स; तसेच 5GB डेटासुद्धा

World Thyroid Day 2026: अचानक शरीरात बदल जाणवत आहेत? थायरॉईडमुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावरील सोपे उपचार समजून घ्या

SCROLL FOR NEXT