heathrow airport plane struck with lightning at london video viral
heathrow airport plane struck with lightning at london video viral 
ग्लोबल

Video: विमानावर कोसळली वीज अन्...

वृत्तसंस्था

लंडन : ढगातून तीन वेगवेगळ्या भागातून वीजा आल्या आणि विमानावर कोसळल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, विमान हिथ्रो विमानतळावर उतरण्याच्या तयारीत होते. त्यावेळी ढगातून आवाज झाला आणि तीन वेगवेगळ्या भागातून तयार झालेल्या वीजा विमानावर पडल्या. यावळी एका व्यक्तीने ते क्षण मोबाईलमध्ये कैद केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. संबंधित व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यानंतर दिसते की, ढगातून तीन दिशेने तीन वेगवेगळ्या वीजा येतात आणि या विमानावर धडकतात. यावेळी या विजांनी सर्व बाजूंनी या विमानाला घेरून आक्रमणच केल्याचे जाणवते. विमानावर वीजा पडल्यानंतर ढगांचा मोठा गडगडाट झाला.

मोबाईलमध्ये ते क्षण कैद करणाऱया व्यक्तीला वीज कोसळल्याचे प्रथम जाणवलेच नाही. तो म्हणाला, "आकाशातील दृश्यं टिपण्यासाठी मोबाईल सुरू केला होता. पण, रॅकॉर्डींग केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर मला धक्काच बसला. विमानावर वीज कोसळली. ही वीज एवढी मोठी होती की कदाचित ती जमिनीवरही कोसळली. सुदैवानं कुणाला काही झालं नसावं अशी आशा मी करतो." दरम्यान, विमानांना विजेपासून संरक्षण देणारे कवच असते. त्यामुळे विमानावर वीज पडली तरी प्रवाशांवर त्याचा परिणाम होत नाही. विमानातील प्रवाशांना फक्त विजेचा प्रकाश दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT