high commission of India honored kili paul  
ग्लोबल

भारताने गौरवले टांझानियाच्या किली पॉलला!

इंस्टाग्रामवर किली अनेक भारतीय लोकप्रिय गाण्यांचे लिप सिंक करतो

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडच्या सूपरहिट गाण्यांवर लिंप सिंक करून ती गाणी गाणापरा टांझानियाचा किली पॉल खूप लोकप्रिय आहे. तो आणि त्याची बहिण नीमा पॉल (Kili Paul and Nima Paul) सोशल मीडियावर (Social Media) खूप लोकप्रिय आहेत. भारतात तर त्यांचे खूप फॅन्स आहेत. किली पॉलचा (Kili Paul) नुकताच टांझानियातील भारतीय उच्चायुक्तालयाने गौरव केला.

भारताचे टांझानियातील उच्चायुक्त बिनया प्रधान यांनी किली पॉलसोबत काही छायाचित्रे ट्विटर वर शेअर केली आहेत. ते म्हणाले की, @IndiainTanzania येथे आजचा दिवस खास होता. प्रसिद्ध टांझानियन कलाकार किली पॉलने लोकप्रिय भारतीय चित्रपटातील गाण्यांवर केलेले व्हिडिओ लिप-सिंकने भारतातील लाखो लोकांची मने जिंकली आहेत. त्याला गौरवताना आम्हाला आनंद होतो आहे.

इंस्टाग्रामवर किली पॉलचे २.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. आयुष्यमान खुराना, गुल पनाग, रिचा चढ्ढा असे अनेक कलाकार त्याला फॉलो करतात. इंस्टाग्रामवर किली अनेक भारतीय लोकप्रिय गाण्यांचे लिप सिंक करत असतो. तसेच नृत्यही करत असतो. त्यामुळे त्याच्या कलेला चांगली पसंती मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT