ग्लोबल

हाँगकाँगच्या त्सांग यिन हंग यांनी सर्वात वेगानं सर केला 'माउंट एव्हरेस्ट'

बाळकृष्ण मधाळे

सातारा : हाँगकाँगची (Hong Kong) गिर्यारोहक त्सांग यिन-हंग (Tsang Yin-hung) या 44 वर्षांच्या माजी शिक्षिकेने केवळ 25 तास आणि 50 मिनिटांमध्ये माउंट एव्हरेस्ट शिखर गाठून विश्वविक्रम केला आहे. त्सांग यिन-हंग यांनी फुंजो लामा या नेपाळी महिलेचा विक्रम मोडला, ज्यांनी 2018 साली 39 तास आणि 6 मिनिटांत गिर्यारोहण पूर्ण केले होते. (Hong Kong Mountaineer Tsang Yin Hung Recorded The Worlds Fastest Ascent Of Everest By A Woman)

हाँगकाँगची गिर्यारोहक त्सांग यिन-हंग या 44 वर्षांच्या माजी शिक्षिकेने केवळ 25 तासात माउंट एव्हरेस्ट शिखर गाठून विश्वविक्रम केला आहे.

त्सांग यांचा जन्म चीनमध्ये (China) झाला. मात्र, वयाच्या 10 व्या वर्षी त्या कुटुंबीयासमवेत हाँगकाँगला गेल्या आणि तिथेच त्या स्थायिक झाल्या. दरम्यान, मागील वर्षी कोविडच्या कारणामुळं गिर्यारोहणावर पूर्ण बंदी घालण्यात आली होती. तो हंगामही रद्द केला होता. मात्र, यंदा नेपाळने या हंगामासाठी परमिशन काढली असून 408 गिर्यारोहकांची नोंद करुन घेतलीय. यामध्ये आत्तापर्यंत 350 हून अधिक लोकांनी एव्हरेस्टची चढाई केले आहे. यात अमेरिकेचे 75 वर्षीय आर्थर मुइर (Arthur Muir) यांनी 8,848.86 फूट उंचीवर जाऊन एव्हरेस्टचं शिखर सर केलंय. मुइर हे अमेरिकेतील सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. आर्थर मुइर यांच्यापूर्वी हा रेकॉर्ड बिल बुर्के (Bill Burke) यांच्या नावावर होता. त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी 2009 मध्ये एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे.

Tsang

सर्वात जलद एव्हरेस्ट शिखर गाठण्याचा बहुमान यंदा हाँगकाँगच्या 'त्सांग' या महिलेनं पटकावलाय. चार वर्षांपूर्वीच त्सांग यांनी गिर्यारोहक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि तिच्या मित्रांनीच तिला या मोहिमेबद्दल कल्पना देखील दिली होती. शनिवारी (29 मे) दुपारी 1.20 वाजता बेस कॅम्पमधून निघालेल्या त्सांग दुसर्‍या दिवशी रविवारी (30 मे) दुपारी 3.10 वाजता शिखरावर पोहोचण्यास यशस्वी झाल्या. यापूर्वी 2017 मधला विक्रम देखील 'त्सांग' यांच्याच नावावर आहे.

Tsang Yin-hung

माउंट एव्हरेस्ट पर्वताबद्दल माहिती : माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतरांगातील ह्या शिखराची उंची 8,848.86 मीटर इतकी आहे. एव्हरेस्ट पर्वत नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये एव्हरेस्ट पर्वताला ‘सागरमाथा’ म्हणून ओळखतात, तर तिबेटमध्ये ‘चोमो लुंग्मा’ म्हणतात. कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले गेले आहे. सर जॉर्ज एव्हरेस्ट हे 1840 साली ब्रिटिश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख होते. एव्हरेस्टवर पहिली चढाई 1953 साली ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली.

mountaineer tsang

जगातील सर्वात उंच 10 शिखरे

  1. माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच.

  2. माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.

  3. कांचनगंगा (भारत )  - 8586 मीटर उंच.

  4. ल्होत्से (नेपाळ)  - 8516 मीटर उंच.

  5. मकालू (नेपाळ)  - 8463 मीटर उंच

  6. चो ओयू (नेपाळ)  - 8201 मीटर उंच.

  7. धौलागिरी (नेपाळ)  - 8167 मीटर उंच.

  8. मानसलू (पश्चिम नेपाळ)  - 8163 मीटर उंच

  9. नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर)  - 8125 मीटर उंच.

  10. अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ)  - 8091 मीटर उंच.

Hong Kong Mountaineer Tsang Yin Hung Recorded The Worlds Fastest Ascent Of Everest By A Woman

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer च्या जीवाला होता धोका, BCCI च्या मेडिकलने टीमने वेळीच पावलं उचलली नसती, तर...

Latest Marathi News Live Update : कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव भाजपामध्ये

Video : ईश्वरी करणार राकेशचा अर्णवच्या खुनाचा प्लॅन फेल; प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "सगळे मठ्ठ आहात का ?"

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

ठरलं! ‘कांतारा चॅप्टर 1’ वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री, तारिख जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT