socialmedia 
ग्लोबल

सौदीतील तेल कंपनीवर हौथी बंडखोरांचा हल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पीटीआय

दुबई - सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात असलेल्या तेल प्रक्रिया केंद्रावर क्षेपणास्त्राने हल्ला केल्याचा दावा येमेनमधील हौथी बंडखोरांनी केला आहे. सौदीमधील जी २० गटाची परिषद संपून काही तास उलटले नाही तोच हा हल्ला केल्याचे बंडखोरांनी म्हटले आहे. या हल्ल्याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. मात्र, या व्हिडिओबाबत अथवा हल्ल्याबाबत सौदीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

हौथी बंडखोरांचा म्होरक्या असलेल्या ब्रिगेडिअर जनरल येहिया सरी याने याबाबत ट्वीट केले आहे. आम्ही दोन कड्‌स क्षेपणास्त्रे डागले असून अरॅम्को कंपनीच्या एका केंद्रावर हल्ला झाल्याचे त्याने सांगितले. या केंद्रावर तेल उत्पादने साठविली जातात. हे केंद्र जेद्दाह आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच आहे. सौदी अरॅम्को ही या देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी आहे. 

हौथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा असून सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडी २०१५ पासून त्यांच्याशी लढत आहे. येमेनची राजधानी सानाचा ताबा बंडखोरांकडे आहे. सौदीने येथे केलेल्या हवाई  कारवाईत अनेक सामान्य नागरिकांचा जीव गेल्याचा दावा केला जात आहे. 

(Edited By- Kalyan Bhalerao)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT