novel coronavirus  
ग्लोबल

हिवाळ्यात कोरोनाचा धोका जास्त; रिसर्चमध्ये नेमकं काय म्हटलंय?

पीटीआय

लॉस एन्जेलिस: कोरोनाव्हायरच्या संसर्गासंदर्भात सातत्याने संशोधन होत आहे. नव्या संशोधनानुसार उन्हाळ्यात कोरोनाचा प्रसार सूक्ष्मतुषारांमुळे मोठ्या प्रमाणावर झाला. हिवाळ्यातील थंडीच्या दिवसांत श्‍वास घेताना बाहेर पडणाऱ्या कणांशी थेट संपर्क आल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो, असे मत एका संशोधनात व्यक्त केले आहे. 

‘नॅनो लेटर्स’ या नियतकालिकात यासंबंधीचा पथदर्शी अभ्यासलेख प्रसिद्ध झाला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या सुरक्षित अंतराचे पालन केले जाते, ते पुरेसे नाही, याकडे लेखातून लक्ष वेधले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ सांता बार्बरा येथील या लेखाच्या सहलेखक यानयिंग झू म्हणाले की, सहा फूट सुरक्षित अंतराची शिफारस ‘सीडीसी’ने केली असली तरी श्‍वसनावाटे उडणारे तुषार हे त्यापेक्षा जास्त अंतरापर्यंत पोचतात.

घर किंवा कार्यालयांतील अंतर्गत वातावरणात जेथे फ्रिज, कुलर यांचे तापमान कमी असते हे तुषार जमिनीवर पडण्यापूर्वी सहा फुटापर्यंत पोचू शकतात. अशा वातावरणात विषाणू जास्त काळ टिकतो आणि काही मिनिटांपासून संपूर्ण दिवस त्यापासून संसर्गाचा धोका कायम राहतो. यानुसार मांस प्रक्रिया केंद्रातून कोरोना विषाणूंचा संसर्ग झपाट्याने पसरू शकतो, असे म्हणता येऊ शकेल. 

याउलट उष्ण आणि कोरड्या वातावरणात श्वासावाटे बाहेर पडणाऱ्या तुषारांचे सहजपणे बाष्पीकरण होते. अशा स्थितीत या कणांमधून अगदी लहान विषाणूंचे कण मागे राहतात. हवेतून विषाणूंचे कण त्यात मिसळतात. विषाणूंचे हे कण १० मायक्रॉनपेक्षा लहान असल्याने बोलण्यातून श्‍वासावाटे ते सहज आत प्रवेश करतात, असे अभ्यासाचे मुख्य लेखक ली झाओ यांनी सांगितले. 

अभ्यासातील निरीक्षणे 
- हिवाळ्यात अशा विषाणूंच्या कणांशी संपर्क झाल्यात कोरोना होण्याचा धोका अधिक. 
- उन्हाळ्यात हवेतून संसर्गाचे प्रमाण जास्त. 
- स्थानिक वातावरणानुसार कोरोनापासून बचावाच्या उपायांमध्ये बदल करणे आवश्‍यक. 
- कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी राहावे यासाठी नियमावली तयार करण्यास या संशोधनाची मदत 
- एखाद्याच्या शरीरावर कोरोनाचे विषाणू किती काळ राहतात, हे समजू शकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी आणि आता: भारतातील खाजगी मालमत्ता व्‍यवस्‍थापन कसे बदलले

Vasai Metro: सुखद प्रवासाचे संकेत, वसई-विरार मेट्रोला एमएमआरडीएचा हिरवा कंदील; प्रकल्पाचा प्रस्ताव तयार

'अरे हिच्याकडे कोणी बघत सुद्धा नाही' कान 2026 मध्ये आलियाला फोटोग्राफर्सने केलं इग्नोर, नेटकरी म्हणाले, 'किती तो स्वत:चा अपमान'

FDA Action: बनावट पनीर तयार केल्यास कठोर कारवाई, नव्या कायद्यात कडक शिक्षेची तरतूद

Latest Marathi News Live Update : पुण्यात NEET पेपर फुटी प्रकरणी पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT