Taliban Sakal
ग्लोबल

३१ ऑगस्टनंतर थांबलात तर याद राखा; तालिबान्यांचा अमेरिकेला इशारा

विनायक होगाडे

काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर देश सोडून जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मोठ्या संख्येने लोक आपापल्या देशात परतत आहेत. अमेरिका आणि नाटो सैनिकांनी देखील अफगाणिस्तान देश जवळपास सोडून दिला आहे. मात्र, अद्यापही तालिबानी सत्तेमुळे बाहेर पडण्यासाठी मोठ्या संख्येने अमेरिकन सैनिक काबूल एअरपोर्टवर उपस्थित आहेत. अमेरिकन सैनिकांनी काबूल एअरपोर्ट आपल्या ताब्यात घेतलं आहे.

या दरम्यानच तालिबानने अमेरिकेला एक इशारा दिला आहे. अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेण्याची ३१ ऑगस्टची मुदत टळून गेल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा तालिबानने अमेरिकेला दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आधी जाहीर केलेली ३१ ऑगस्टची तारीख हीच तालिबानने अंतिम असल्याचे गृहीत धरले आहे. रविवारी बायडेन यांनी आपल्या प्रशासनाबरोबरील चर्चेची माहिती दिली. ही मुदत वाढविण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याच्या मोहिमा काबूल विमानतळावरून पार पडणे सुकर व्हावे हा त्यांचा उद्देश आहे.

या पार्श्वभूमीवर तालिबानकडून हा इशारा देण्यात आला. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार ३१ ऑगस्टपूर्वी नवे सरकार स्थापन करण्याबाबत तालिबानला कोणतीही घोषणा करता येणार नाही. त्यामुळे अमेरिका आणि मित्र देशांचे सैन्य लवकरात लवकर परतावे यासाठी तालिबान दडपण आणत आहे.

ब्रिटनकडून मागणीची शक्यता

जी७ समूहातील देशांची तातडीची बैठक मंगळवारी होणार आहे. त्यावेळी ब्रिटनकडूनही सैन्यमाघारीची मुदत वाढविण्याबाबत मागणी होण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन तसे आवाहन करण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

माेठी बातमी! 'म्‍हसवडमधील १४ शेतकऱ्यांची जमीन शासनाकडे'; ३२ वर्षे माेबदलाच नाही, स्‍वखुशी’ शब्‍दाने ‘खुदकुशी’ची वेळ

SCROLL FOR NEXT