CoronaVirus
CoronaVirus 
ग्लोबल

कोरोनातून बरे झालेल्यांच्या शरीरात आठ महिने टिकते प्रतिकारशक्ती

पीटीआय

मेलबर्न - कोरोनाचा संसर्ग होऊन त्यातून बरे झालेल्यांच्या शरीरात या विषाणूविरोधात किमान आठ महिने प्रतिकारशक्ती राहते, असे ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीचाही अधिक चांगला परिणाम होण्याचा अंदाज या संशोधकांनी व्यक्त केला आहे.

कोरोना विषाणूविरोधात शरीरात तयार होणारी प्रतिपिंडे काही महिन्यांनंतर निष्प्रभ होतात आणि त्यामुळे लोकांमधील प्रतिकारशक्ती वेगाने कमी होते, असा याआधी करण्यात आलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष होता. मात्र, ‘सायन्स इम्युनॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनाने लोकांना दिलासा दिला आहे. ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शरीरातील प्रतिकार यंत्रणेतील ‘मेमरी बी’ या विशेष पेशी विषाणूकडून झालेल्या संसर्गाची नोंद ठेवते. त्यामुळे त्याच विषाणूचा पुन्हा संसर्ग झाल्यास वेगाने प्रतिपिंडे निर्माण होऊन विषाणूपासून संरक्षण मिळते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संशोधकांनी २५ कोरोनाबाधितांचा त्यांना बाधा झाल्यापासूनच्या चौथ्या दिवसापासून ते २४२ व्या दिवसापर्यंत अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. 

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, संसर्ग झाल्यानंतर वीस दिवसांनी प्रतिपिंडांची संख्या कमी होण्यास सुरुवात होते. मात्र, प्रत्येक रुग्णामध्ये ‘मेमरी बी’ पेशी असल्याने त्या विषाणूला लक्षात ठेवतात. या पेशी सर्वसाधारणपणे संसर्गानंतर आठ महिने रुग्णाच्या शरीरात राहतात. त्यामुळेच, आठ महिन्यांपर्यंत विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती काम करते.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: मोदींच्या डोक्यावर शिवशाही जिरेटोप ! वाराणसीमधील उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेलांनी केला सत्कार

Video: मोदींची मिमिक्री करणाऱ्या कॉमेडियन श्याम रंगिलाला उमेदवारी अर्जच मिळेना! वाराणसीमधून लढण्यासाठी सज्ज

IPL 2024 : बंगळुरूचे प्लेऑफचे स्वप्न भंगणार... चाहत्यांचे टेन्शन वाढले; RCB vs CSK सामना होणार रद्द? हे आहे कारण

Operation Amanat : ट्रेनमध्येच विसरला फोन किंवा चार्जर..? छोट्या-मोठ्या गोष्टीही मिळतील परत; रेल्वेचं 'ऑपरेशन अमानत' करेल मदत

'पती रोज 5 रुपयांचे कुरकुरे आणत नाही..', नाराज पत्नी जाऊन बसली माहेरी; घटस्फोटापर्यंत गेलं प्रकरण

SCROLL FOR NEXT