Imran Khans pain over corona says No one helped even a dollar 
ग्लोबल

Coronavirus : पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून मदत नाही

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : कोरोनाच्या संकटात पाकिस्तानला अजून कोणत्याच देशाने आर्थिक मदत केलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच याला दुजोरा दिला आहे. इम्रान खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसोबत बातचित केली. पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून एक रुपयाचीही मदत झालेली नसल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेविषयीही चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का लागला आहे. कोणताही देश किंवा जागतिक संघटनेने पाकिस्तानला कुठलीही मदत केलेली नाही. पण आयएमएफने कर्ज फेडण्यासाठी दिलासा दिला आहे, असे इम्रान खान यांनी सांगितलं आहे. इम्रान खान म्हणाले 'कोरोनानंतरची स्थिती संपूर्ण जग आणि पाकिस्तानसाठी परीक्षा असेल. युरोप आणि अमेरिकेपेक्षा पाकिस्तानची स्थिती वेगळी आहे. लॉकडाऊनचा दुष्परिणाम पाकिस्तानवर झाला आहे. मला लॉकडाऊन लागू करायचा नव्हता, कारण मजूर आणि रोजंदारीवर कमावणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. पाकिस्तानमध्ये ७५ टक्के मजूर नोदंणीकृत नाहीत.'

इम्रान खान यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला. अनेक लोकं सोशल मीडियावर खोटा प्रचार करत आहेत. 'ज्यांनी भ्रष्टाचाराने पैसे कमावले आहेत, त्यांना मीडियाची भीती वाटत आहे, कारण, आपला बिंग फुटेल. आयएसआयने ट्रॅक ऍण्ड ट्रेस सिस्टिम सुरू केली आहे. यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट शोधायला मदत होईल,' असेही इम्रान खान यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Water Supply: लाखाचं बिल कोटीत जातंय! पाण्याचा हिशोब नाही हे अपयशच, पालकमंत्री आबिटकरांनी टोचले महापालिकेचे कान..

Pune Heatwave: पुण्यात उन्हाचा कहर; २०१९ नंतर प्रथमच एप्रिलमध्ये तापमान ४१.८°वर, सलग पाच दिवस ४० पार!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिलेचा मृत्यू

Nagpur News: स्मार्ट सिटी की अतिक्रमण सिटी?; नागपूरकरांचा संताप; फुटपाथवर अतिक्रमणाचे साम्राज्य

ऊन्हाच्या झळा तीव्र! पुण्यासह राज्यात उष्माघाताने तिघांचा मृत्यू, अमरावतीत ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT