Imran Khans speech canceled after meeting with Army Chief
Imran Khans speech canceled after meeting with Army Chief Imran Khans speech canceled after meeting with Army Chief
ग्लोबल

लष्करप्रमुखांच्या भेटीनंतर इम्रान खान यांचे भाषण रद्द; अनेक चर्चा

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) देशाला संबोधित करणार असल्याची चर्चा बुधवारी दिवसभर होती. मात्र, सायंकाळी त्यांचे भाषण पुढे ढकलल्याची बातमी आली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी सायंकाळी इम्रान खान यांची भेट घेतली. त्यानंतरच भाषण पुढे ढकलण्याची बातमी समोर आली. (Imran Khans speech canceled after meeting with Army Chief)

इम्रान खान पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करणार अशी चर्चा दिवसभर होती. याची वेळ ५ वाजता निश्चित करण्यात आली होती. यानंतर ते सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत राष्ट्राला संबोधित करतील असे सांगण्यात आले. परंतु, सायंकाळी ६.३० होताच त्यांचे बुधवारी होणारे संबोधन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली.

संबोधनाच्या काही वेळापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख (Army Chief) जनरल कमर जावेद बाजवा अचानक इम्रान खान यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे डीजीही होते. लष्करप्रमुखांना भेटण्यापूर्वी इम्रान यांनी आणखी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सायंकाळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीलाही संबोधित केले.

३१ मार्चपासून चर्चा

इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला आहे. यावर ३१ मार्चपासून चर्चा होणार आहे. मात्र, याआधी एमक्यूएम आणि पीपीपीच्या करारानंतर इम्रान खान सरकारने बहुमत गमावले आहे.

दोन मंत्र्यांनी दिला राजीनामा

पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) राजीनामा देणार नाही. ते शेवटच्या चेंडूपर्यंत लढतील, असे बुधवारी पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले. बुधवारीच एमक्यूएमच्या दोन मंत्र्यांनी इम्रान यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. एमक्यूएम हा इम्रान खान यांच्या सरकारमध्ये मित्रपक्ष होता. परंतु, अखेरच्या क्षणी त्यांनी विरोधी पक्षांशी तडजोड केली. बुधवारीच विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर निशाणा साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT