america, covid 19, corona  
ग्लोबल

Covid-19: 1000 मृतांची नावे पहिल्या पानावर; न्यूयॉर्क टाईम्सची ट्रम्प सरकारला चपराक

सकाळ डिजिटल टीम

न्यूयॉर्क : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे.  जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोना व्हायरसची सर्वात जास्त झळ पोहोचली आहे. या देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाखांच्या जवळ येऊन पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स या प्रसिद्ध वृत्तपत्राने covid-19 मुळे प्राण गेलेल्या 1000 व्यक्तींची नावं पहिल्या पानावर छापून ट्रम्प सरकारला चपराक लगावली आहे. अमेरिकेमध्ये कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोना बाधितांचा आकडा 17 लाखांच्यावर गेला आहे, तर कोरोनामुळे 99,300 लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनामुळे सर्वाधित प्रभावित झालेल्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश होतो. सुरुवातीला युरोपातील इटली, फान्स, स्पेन इत्यादी देशांमध्ये कोरोना महामारीने भयंकर रुप धारण केले होते. मात्र, त्यानंतर या देशांनी व्हायरसवर नियंत्रण ठेवत मृत्यूची संख्या आटोक्यात आणली. पण, अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

कोरोना महामारीला थोपवण्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सपशेल अपयशी ठरल्याचं दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाखाच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राने ट्रम्प सरकारचे वाभाडे काढले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने 1 लाख मृत्यूंपैकी प्रतिकात्मक म्हणून 1000 व्यक्तींची नावे  पहिल्या पानावर छापून सरकारच समाचार घेतला आहे.
न्यूयॉर्क टाईम्सने 'अमेरिका 1 लाख मृत्यूंच्या उंबरठ्यावर; अगणीत नुकसान'( U.S. DEATHS NEAR 1,00,000; AN INCALCULABLE LOSS)  या शिर्षकाखाली सुरुवातीच्या तीन पानांवर मृत्यू झालेल्यांची नावे आणि त्यांची थोडक्यात माहिती छापली आहे. पहिल्या पानावर अन्य कोणतीही बातमी, जाहिरात, फोटो किंवा इतर काहीही छापण्यात आलेलं नाही. या भूमिकेतून न्यूयॉर्क टाईम्सच्या रविवारच्या अंकाने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

अमेरिकेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने covid-19 चे बळी जाणे ही मोठी शोकांतिका आहे. आणि या शोकांतिकेची विशालता आणि विविधता सांगण्याचा आमचा हेतू होता, असं न्यूयॉर्क टाईम्सकडून सांगण्यात आलं आहे. वृत्तपत्रामध्ये मृतांचं नाव, त्यांचा थोडक्यात तपशील आणि प्रत्येकाच्या जीवाची वैशिष्टता छापली आहे. 'ही केवळ नावांची यादी नाही, ते आपण सर्व आहोत' असं उपशिर्षक न्यूयॉर्क टाईम्सने दिलं आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाखाच्या जवळ असल्याचं सांगितलं जात असलं तरी हा आकडा यापेक्षा अधिक असल्याचं बोललं जात आहे. तसेच कोरोनाचा अमेरिकेत शिरकाव होत असताना ट्रम्प सरकारने दाखवलेल्या निष्काळजीपणा सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप अमेरिकेतील अनेक वृत्तपत्रांनी केला आहे. लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करणं आवश्यक असताना अमेरिकेत अनेक व्यवसाय आणि उद्योगधंदे सुरुच ठेवण्यात आले. त्यामुळे देश आणीबाणीसारख्या परिस्थितीतून जात असल्याचं अनेकांचं म्हणण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT