Chinese Foreign Minister Wang Yi’s India visit sparks major discussions on resolving the ongoing LAC dispute between India and China. esakal
ग्लोबल

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Wang Yi visit : वांग यी यांच्या भारत भेटीनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्त्वपूर्ण विधान

Mayur Ratnaparkhe

Chinese Foreign Ministry’s Official Statement : गलवान संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पुर्वी भारत आणि चीन यांच्यातील संबंधाबाबत एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, १८ आणि १९ ऑगस्ट रोजी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भारत भेटीनंतर भारत आणि चीनमधील महत्त्वपूर्ण करार शक्य झाला आहे.

भारत दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एनएसए अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी व्यापक चर्चा केली. यासोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती.

यानंतर आता  भारत आणि चीन सीमा वादाशी संबंधित एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. चीन परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या नवी दिल्ली भेटीनंतर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतासोबतचा मोठा सीमा वाद मिटवल्याचा दावा केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, भारत आणि चीनमध्ये सीमा व्यवस्थापन आणि नियंत्रणाबाबत एक समान विचार निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील सीमेवरील सुमारे ५ वर्षांपासूनचा तणाव कमी होण्याची शक्यता आहे.

वांग यांच्या दौऱ्याबाबत माहिती देताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, दोन्ही बाजूंनी विविध क्षेत्रात संवाद यंत्रणा पुनर्संचयित करणे, परस्पर फायदेशीर सहकार्य वाढवणे, बहुपक्षीयता टिकवून ठेवणे, जागतिक आव्हानांना संयुक्तपणे तोंड देणे आणि धमकावणाऱ्या एकतर्फी कृतींना विरोध करणे यावरही सहमती दर्शविली.

 तसेच, "सीमा मुद्द्यावर, दोन्ही बाजूंनी एक नवीन समान समजूत काढली आहे, ज्यामध्ये सामान्य व्यवस्थापन आणि नियंत्रण, सीमावर्ती भागात शांतता राखणे आणि अटी पूर्ण करणाऱ्या क्षेत्रात सीमा चर्चा पुन्हा सुरू करणे यावर सहमती दर्शविली आहे." अशीही माहिती दिली गेली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karoline leavitt ट्रम्प यांच्या २८ वर्षीय अधिकारी तरुणीनं ६० वर्षीय व्यक्तीशी का केलं लग्न? स्वत:च केला खुलासा

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

Latest Marathi News Update LIVE : थार आणि कारचा भीषण अपघात, ५०० फूट खोल दरीत कार कोसळली, ६ पैकी ४ जणांचे मृतदेह सापडले, २ अजूनही बेपत्ता

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

Swarnagiri Temple Tourism: स्वर्गासारखे तेजस्वी ‘स्वर्णगिरी’ मंदिर पाहताक्षणी मन मंत्रमुग्ध होते! जाणून घ्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग

SCROLL FOR NEXT