ग्लोबल

चीनला रोखण्याची ताकद फक्त भारतातच; अमेरिकन संरक्षण सचिवांचं विधान

भारताची वाढती शक्तीच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात स्थिरता प्रस्थापित करू शकते, असा अमेरिकेचा विश्वास आहे.

सकाळ डिजिटल टीम

सिंगापूर : चीनची आक्रमक वृत्ती आणि इंडो-पॅसिफिक (Indi-Pacific) क्षेत्रातील चीनची वाढत्या हालचालींवर जगातील प्रत्येक देश भारताकडे एका वेगळ्या आशेने पाहत असून, चीनला रोखण्याची ताकद फक्त भारतातचं आहे, असे मत अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी व्यक्त केले आहे. ते सिंगापूरमधील शांग्री लॉ येथील एका कार्यक्रमात बोलत होते.( American Defense Secretory On India Power )

ते म्हणाले की, अनेक देशांचा असा विश्वास आहे की, आशियामध्ये केवळ भारतच शक्ती संतुलन स्थापित करू शकतो. भारताची वाढती शक्तीच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात स्थिरता प्रस्थापित करू शकते, असा अमेरिकेचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. चीन इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आक्रमक वृत्ती स्वीकारत आहे आणि बेकायदेशीरपणे सागरी क्षमता वाढवत आहे.

अमेरिका मित्रराष्ट्रांच्या सोबतच

चीन तैवानला आपला भाग मानतो. याशिवाय इतर देशांच्या काही भागांवरही चीन आपला दावा मांडत सांगत आहे. त्यासाठी आक्रमक भूमिकाही अवलंबत आहे. या सर्व घडामोडींमध्ये अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे ऑस्टिनम यांनी स्पष्ट केले. चीन आक्रमक वृत्ती स्वीकारत असून, त्याचे भारतासोबत सीमा विवाद आहेत.

याशिवाय व्हिएतनाम, तैवान, फिलीपिन्स, ब्रुनेई, मलेशियाच्या काही भागांवरही चीनकडून दावा केला जात आहे. अशा स्थितीत भविष्यातील आक्रमण रोखण्यासाठी आणि चीनला योग्य तो धडा शिकवण्यासाठी अमेरिका पूर्णपणे सज्ज आहे. सुरक्षा पायाभूत सुविधा पारदर्शक आणि अधिक समावेशक बनवण्यासाठी अमेरिका त्याच्या मित्र राष्ट्रांसोबत एकत्र काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सर्व आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवली

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT