India Foreign Minister S Jaishankar  esakal
ग्लोबल

UNमध्ये युक्रेनवरील मतदानास भारताचा नकार, अमेरिकेचा दबाव असताना रशियाला पाठिंबा

रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान तणाव सुरुच आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान तणाव सुरुच आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) या तणावाच्या मुद्द्यावरील चर्चेच्या मागणीवरील मतदानात सहभाग घेण्यास नकार दिला आहे. भारताने सुरक्षा परिषदेच्या प्रक्रियात्मक मतदानात सहभाग न घेता म्हटले की शांतता आणि रचनात्मक पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या व्यापक हिताचा विचार करता सर्व पक्षांद्वारे तणाव वाढवणारे कोणतेही पाऊल टाकण्याचे टाळले पाहिजे. सुरक्षा परिषदेत एक प्रस्ताव आणला गेला. त्यात युक्रेनच्या (Ukraine) सीमावर्ती स्थितीवर चर्चा करण्याची मागणी केली गेली. तेव्हा भारताना विरोध दर्शवला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशिया-युक्रेन वादावरील चर्चेसाठी होणाऱ्या बैठकीपूर्वी सोमवारी प्रक्रियात्मक मतदानाचे आवाहन करण्यात आले. (India Not Vote On Ukraine In United Nations Security Council)

परिषदेचा स्थायी सदस्य आणि नकार अधिकार (व्हेटो) असलेल्या रशियाने (Russia) ते निर्धारित करण्यासाठी एक प्रक्रियात्मक मतदानाचे आव्हान केले की खुली बैठक पुढे न्यायला हवी का? अमेरिकेच्या पुढाकाराने होणाऱ्या बैठकीला पुढे नेण्यासाठी परिषदेत नऊ मतांची आवश्यकता होती. रशिया आणि चीनने बैठकीत विरोधात मतदान केले. दुसरीकडे भारत, गॅबाॅन आणि केनियाने यात सहभाग घेतला नाही. या व्यतिरिक्त फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनसह परिषदेचे इतर सर्व सदस्यांनी बैठक घेण्याच्या बाजूने मतदान केले. संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस.तिरुमूर्ती परिषदेत म्हणाले, की नवी दिल्ली रशिया आणि अमेरिकेच्या दरम्यान सुरु असलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा वार्तांसह पॅरिसमध्ये नाॅरमँडी प्रस्तावानुसार युक्रेनशी संबंधित घटनाक्रमावर बारकाईने नजर ठेवून आहे. (India's Stand On Ukraine In United Nations Security Council)

भारताने आपली बाजू मांडली

भारताचे (India) स्थायी प्रतिनिधी टी.एस तिरुमूर्ती म्हणाले, की भारताचे हित एक असे समाधान शोधण्यात आहे ज्यात सर्व देशांची सुरक्षा ध्यानात ठेवून तणाव तात्काळ कमी करता येईल. त्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थिरता राखणे हा आहे. शांतता आणि रचनात्मक राजनयिता ही वेळेची मागणी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी व्यापक हितात सर्व पक्षांच्या वतीने तणाव वाढवणारे कोणताही निर्णय घेण्यापासून वाचले पाहिजे. तिरुमुर्ती परिषदेत म्हणाले, की २० हजारांपेक्षा अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनच्या सीमावर्ती भागासह वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि शिक्षण घेतात. भारतीय नागरिकांची सुरक्षा हे आमच्यासाठी अग्रक्रम आहे.

मतदान न करण्याचे कारण

आता प्रश्न येतो की भारताने असे का केले? आंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ज्ञ मानतात की राजनयिक पातळीवर हे जरुरीचे होते. जर भारताने रशियाच्या बाजूने मतदान केले असते तर त्याचा रशियाशी असलेल्या संबंधांवर गंभीर परिणाम झाला असता. अशा स्थितीत भारताने मध्यम मार्ग निवडत मतदानापासून दूर राहणे पसंत केले. युक्रेन आणि रशिया दरम्यान या वेळी युद्धासारखी स्थिती आहे. रशियाने आपल्या सीमेवर एक लाखांपेक्षा अधिक सैनिक तैनात केले आहे. दुसरीकडे युक्रेनने ही अमेरिका आणि इतर नाटो देशांचे शस्त्रास्त्रे रशियाच्या सीमेवर पाठवत आहे. बातमी आली होती की रशिया लवकरच युक्रेनवर हल्ला करु शकतो. मात्र रशियाने यास वृत्तास दुजोरा दिलेला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT