modi with jinping
modi with jinping 
ग्लोबल

गेल्या 5 वर्षात PM मोदी जिनपिंग यांना 18 वेळा भेटले, तरीही भारत-चीन संबंधात तणाव 

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात झालेल्या चीनी हल्ल्यावेळी भारतीय जवानांकडेही शस्त्रे होती. परंतु, भारतीय सैनिक त्याचा वापर करू शकत नव्हते, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यामुळे चीनने आतापर्यंत झालेल्या तीन करारांना तिलांजली दिली आहे. भारताने त्याचे पालन केले आहे, मात्र चीन याबाबत बेफिकीर आहे, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत पाचवेळा चिनचा दौरा केला आहे. तर शी जिनपिंग यांची 18 वेळा भेटही घेतली आहे. त्यानंतरही दोन्ही देशांमधील संबंध सुधारलेले नाहीत का असा प्रश्न निर्माण होत आहे.

गलवान खोऱ्यातील घटनेत चीनने 1993, 1996, 2013 या तीन करारांचा भंग केला आहे. गेल्या 27 वर्षात भारत आणि चीन यांच्यामध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांती कायम ठेवण्यासाठी पाच करार झाले आहेत. चीनबरोबरच्या चर्चेला 90च्या दशकात सुरूवात झाली होती. 1988 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी चीनचा दौरा केला होता. 1993मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव चीनच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांती ठेवण्याबाबत करारावर सह्या करण्यात आल्या. 

1993 च्या करारानुसार दोन्ही सैन्यांनी ताबा रेषा पार केल्यास त्यांना सावध केल्यानंतर दोन्ही सैन्य मागे हटेल. प्रत्यक्षात चीनी सैन्याने याच्या उलट केले. तणावाची स्थिती निर्माण झाल्यास दोन्ही सैन्य ताबा रेषेवर एकत्र येऊन त्यावर मार्ग शोधतील. प्रत्यक्षात चीनी सैन्याने भारतीय जवानांवर हल्ला केला. 

1996 ला आधीचा करार अधिक व्यापक केला गेला. 1996 मध्ये चीनचे राष्ट्रपती जियांग जेमिन आणि तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी त्यावर सह्या केल्या होत्या. त्यानुसा कोणत्याही कारणांनी दोन्ही सैन्य समोरासमोर आल्यास ते संयम ठेवतील. वाद थांबवतील. प्रत्यक्षात, पहिल्यांदा चिनी सैनिकांनी आपला संयम हरवला. येथून व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये ते दिसून येते. शस्त्रांच्या आधारे एकमेकांना धमकी दिली जाणार नाही. प्रत्यक्षात लष्करी सराव करताना चीनी मीडियाने भारताला धमकी दिली. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या दोन किलोमीटर परिसरात फायरिंग होणार नाही. आग, विस्फोट आणि घातक रसायनांचा वापर करणार नाही. दोन्ही देश ताबा रेषेवर सैन्याचा वापर करणार नाहीत आणि तशी धमकी देणार नाहीत. 

2005, 2012, 2013मध्ये पुन्हा करार 
2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारने प्रतिनिधी स्तरावरील एक विशेष यंत्रणा तयार केली. त्यानंतर 2005, 2012 आणि 2013 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात सीमावादावरून तीन करार झाले. त्यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर चीनमध्ये भारताचे राजदूत होते. प्रतिधिनी स्तरावर चर्चा बाजूला ठेवून चीनने या कराराचाही भंग केला. 

पंतप्रधानांची पाचवेळा चीन भेट 
नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पाच वेळी चीनला भेट दिली आहे. तसेच त्यांची चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची 18 वेळा भेट झाली आहे. मोदी यांनी दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी एप्रिल 2018 मध्ये झालेल्या वुहानमधील समिटमध्येही भाग घेतला होता. याचाच पुढचा भाग म्हणून 2019 मध्ये तमिळनाडूमध्येही औपचारिक बैठक झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT