Taliban esakal
ग्लोबल

भारताच्या 'या' उदारतेवर तालिबान खूश; अफगाणिस्तानचा 'आनंद' गगनात मावेना

सकाळ डिजिटल टीम

भारताच्या 'या' उदारतेनं तालिबानला आनंद झालाय.

भारतानं (India) शुक्रवारी युद्धग्रस्त अफगाणिस्तानला (Afghanistan) 'मानवतावादी' मदतीचा भाग म्हणून दोन टन जीवनरक्षक औषधांची खेप पाठवलीय. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, जीवरक्षक औषधांची ही खेप काबूलमधील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या (Indira Gandhi Hospital Kabul) अधिकार्‍यांना मदतीअंतर्गत सुपूर्द करण्यात आलीय. मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय की, अफगाणिस्तानातील लोकांना चालू असलेल्या मानवतावादी मदतीचा एक भाग म्हणून, भारतानं आज तिसर्‍या खेपेत दोन टन जीवनरक्षक औषधं अफगाणिस्तानला पाठवली आहेत, असं सांगितलं.

भारताच्या या उदारतेनं तालिबानला (Taliban) आनंद झालाय. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Jabiullah Mujahid) यांनी ट्विट करून याचं स्वागत केलंय. मुजाहिद यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, भारताच्या या मानवतावादी मदत आणि सहकार्याबद्दल आभारी आहोत, असं त्यांनी नमूद केलंय. परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, अफगाणिस्तानमधील लोकांशी विशेष संबंध सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांना मदत देण्यासाठी भारत नेहमी कटिबद्ध असेल. आम्ही अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) अफगाणिस्तानला अँटी-COVID-19 लसीचे 5,00,000 डोस आणि 1.6 टन वैद्यकीय मदत पुरवलीय, असं मंत्रालयानं म्हटलंय. येत्या आठवड्यात, आम्ही अफगाणिस्तानला औषधं आणि अन्नधान्यांसह मानवतावादी मदतीची अधिक खेप पुरवत आहोत, असंही ते म्हणाले.

Medicines

अशरफ गनी (Ashraf Ghani) सरकारनं भारतातील अफगाण राजदूत म्हणून नियुक्त केलेले फरीद मामुंदझाई यांनी मदतीसाठी नवी दिल्लीचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट केलंय की, अफगाण लोकांना आवश्यक मानवतावादी मदत पुरवल्याबद्दल भारताचं आभार. 2 टन अत्यावश्यक जीवनरक्षक औषधांसह वैद्यकीय मदतीची तिसरी खेप आज काबूल येथील इंदिरा गांधी रुग्णालयात पोहोचलीय. अफगाणिस्तानला अशा पुरवठ्याची नितांत गरज आहे, असं त्यांनी म्हंटलंय. डिसेंबरमध्ये भारतानं अफगाणिस्तानला 1.6 मेट्रिक टन वैद्यकीय मदत पुरवलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT