Leaders of India and the UK shake hands after signing the historic Free Trade Agreement, expected to impact prices of daily commodities, electronics, and exports.  esakal
ग्लोबल

India UK Free Trade Deal: भारत अन् ब्रिटनमध्ये मुक्त व्यापर करारावर स्वाक्षरी; जाणून घ्या, काय स्वस्त अन् काय महागणार?

India UK Free Trade Agreement signed: लंडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पतप्रधान केयर स्टेर्मर यांच्या भेटीदरम्यान, मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

Mayur Ratnaparkhe

Overview of India-UK Free Trade Agreement : भारत आणि ब्रिटनमध्ये अखेर मुक्त व्यापार करार झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, जागतिक स्तरावर दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मजबूत होईल. आज(गुरूवार) लंडनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टेर्मर यांच्या भेटीदरम्यान, मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. 

औषधांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन वस्तू स्वस्त होतील. तथापि, काही गोष्टी महागड्या देखील असतील, ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या खिशावर होईल. एकूणच भारत-ब्रिटनमधील हा करार दोन्ही देशांच्या सामान्य लोकांसाठी देखील खूप फायदेशीर ठरणार असल्याचे दिसते.

या कराराबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, यामुळे दोन्ही देशांची अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळेल. यासोबतच नोकरीच्याही संधीही खुल्या होतील. मुक्त व्यापार कराराद्वारे, भारत-यूके २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १२० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कार्यकाळात जानेवारी २०२२ मध्ये या कराराबाबत चर्चा सुरू झाली होती. आधी ते २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते.

 या मुक्त व्यापार करारद्वारे, भारताला त्याच्या ९९ टक्के निर्यात उत्पादनांवर ब्रिटनमध्ये करमुक्त निर्यात मिळेल. त्याचवेळी,  भारतातून ब्रिटनमध्ये येणाऱ्या ९० टक्के उत्पादनांवरील शुल्क कमी केले किंवा काढून टाकले जाईल. हा भारतीय कंपन्यांसाठी तसेच सामान्य लोकांसाठी एक मोठा फायदा असणार आहे.

काय महाग अन् काय स्वस्त? -

इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, सागरी उत्पादने, स्टील, धातू आणि दागिने यासह अनेक गोष्टी स्वस्त होऊ शकतात. तर कृषी उत्पादने, कार आणि बाईक सारखी ऑटो उत्पादने महाग होऊ शकतात.

एकूणच मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांची अर्थव्यवस्थाच केवळ मजबूत होणार नाही तर औषधी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन वस्तू सामान्य माणसासाठी स्वस्त होतील. . या करारामुळे भारत आणि ब्रिटनमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नोकऱ्यांची संख्या वाढेल आणि व्यवसायाला चालना मिळेल. तसेच भारतीय कंपन्यांना ब्रिटनमध्ये मोठी बाजारपेठ मिळेल आणि त्यावरील शुल्क एकतर खूप कमी किंवा शून्य असेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavan Clash: धक्कादायक! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये राडा, थेट बुटाने मारण्याची धमकी

AI for Kids: पाचवीची मुले घेताहेत 'एआय'चे धडे; जाणून घ्या काय आहे 'या' खास पुस्तकात

Pimpalgaon Baswant : पिंपळगावात तिजोरी रिकामी, विकासकामे ठप्प; नगर परिषदेसमोर 'भीक मांगो' आंदोलन

''बेफाम गुन्हेगारी वाढलेल्या सरकारला मी पाठिंबा देतोय...'' चिराग पासवान यांनी स्पष्ट सांगितलं

Mumbai - Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनला मृत्यूचा सापळा! ३३५ जणांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT