Canada PM Justin Trudeau Sakal
ग्लोबल

Citizenship of Canada: भारत सोडून लाखो लोकांनी घेतलं कॅनडाचं नागरिकत्व; अमेरिकेनंतर भारतीयांच्या पसंतीचा दुसरा देश

या यादीमध्ये पहिलं स्थान अमेरिकेचं आहे. अमेरिकेचं नागरिकत्व घेतलेल्या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे.

वैष्णवी कारंजकर

भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०१८ ते जून २०२३ या कालावधीमध्ये दीड लाखांच्या आसपास भारतीयांनी कॅनडाचं नागरिकत्व घेतलं आहे. ही संख्या भारत सोडून जाणाऱ्या लोकांच्या संख्येच्या २० टक्के प्रमाणात आहे. यावरुन कॅनडा हा भारतीयांसाठी दुसऱ्या पसंतीचा देश असल्याचं आढळून येत आहे.

या यादीमध्ये पहिलं स्थान अमेरिकेचं आहे. अमेरिकेचं नागरिकत्व घेतलेल्या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. कॅनडानंतर तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आणि चौथ्या स्थानावर ब्रिटन आहे. या देशांचं नागरिकत्व घेण्यासाठी भारतीय भारताचं नागरिकत्व सोडत आहेत. जानेवारी २०१८ ते जून २०२३ या काळामध्ये जवळपास ८ लाखांहून अधिक नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आहे आणि ११४ वेगवेगळ्या देशांचं नागरिकत्व घेतलं आहे.

भारतीय नागरिकत्व सोडलेल्या ५८ टक्के भारतीयांनी कॅनडा आणि अमेरिकेमध्ये जाणं पसंत केलं आहे. भारताचं नागरिकत्व सोडण्याचं प्रमाण दरवर्षी वाढलं आहे. पण २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे नागरिकत्व सोडण्याच्या प्रमाणामध्ये घट झाली होती. २०१८ मध्ये भारताचं नागरिकत्व सोडणाऱ्या लोकांची संख्या सव्वा लाखांच्या जवळपास होती. ही संख्या २०२२ मध्ये २ लाखांच्याही वर गेली आहे. जून २०२३ पर्यंत जवळपास ८७ हजार भारतीयांनी परदेशी नागरिकत्व घेतलं आहे.

इमिग्रेशन एक्सपर्ट विक्रम श्रॉफ यांच्या म्हणण्यानुसार, इंग्रजी भाषिक देशांमध्ये राहण्याला भारतीय पसंती देतात. श्रॉफ म्हणाले की, जीवनशैलीचा स्तर उंचावणे, मुलांचं शिक्षण, रोजगाराच्या संधी, चांगल्या आरोग्य सुविधा ही या स्थलांतराची प्रमुख कारणे आहेत. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये घर आणि नागरिकता मिळवण्यासाठीचे सोपे असलेले नियम यामुळे इतर नागरिक या देशाकडे आकर्षित होतात.

भारत कॅनडा वादामुळे वाढल्या भारतीय वंशाच्या कॅनडातल्या नागरिकांच्या अडचणी

भारत आणि कॅनडा यांच्यादरम्यान खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर हत्याकांड प्रकरणामुळे गेल्या सोमवारपासून वाद सुरू झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत सांगितलं की, निज्जर यांच्या हत्येच्या मागे भारताचा हात आहे. त्यांच्या या आरोपावर भारताने कडक प्रत्युत्तर देत कॅनडाचे आरोप फेटाळले आहेत. या आरोपानंतर कॅनडात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांची संकटं वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT