Inspired by Elon Musk Linda Yaccarino first reaction after becoming Twitter CEO
Inspired by Elon Musk Linda Yaccarino first reaction after becoming Twitter CEO 
ग्लोबल

CEO बनताच लिंडा याकारिनोने मस्कसाठी केले खास ट्विट, म्हणाली...

धनश्री ओतारी

टेस्ला कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांनी लिंडा याकारिनो यांची ट्विटरच्या नवीन सीईओपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर नवीन सीईओ याकरिनोने एलन मस्कसाठी खास ट्विट केले. यामध्ये तिने मस्कचे विशेष कौतुक केले आहे. याकारिनो जाहीरपणे बोलण्याची पहिलीच वेळ होती. (Inspired by Elon Musk Linda Yaccarino first reaction after becoming Twitter CEO)

इलॉन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वीच ट्विटरची मालकी मिळवली होती. त्यांनी शुक्रवारी ट्विटरच्या नवीन सीईओ लिंडा याकारिनो यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

मस्कचे आभार मानताना, याकारिनो यांनी ट्विट केले, "उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या तुमच्या दृष्टीकोनातून मला खूप दिवसांपासून प्रेरणा मिळाली आहे. ही दृष्टी ट्वीटरवर आणण्यासाठी आणि या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मी मदत करण्यासाठी उत्साहित आहे."

तर ही लिंडा याकारिनो आहे तरी कोण?

लिंक्डइन प्रोफाइलनुसार, लिंडा याकारिनो 2011 पासून NBC युनिव्हर्सलमध्ये आहेत. अध्यक्ष, ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग आणि पार्टनरशिप म्हणून काम करत आहेत. याआधी त्यांनी कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागातही काम केले आहे.

लिंडा याकारिनो यांनी पेन स्टेट युनिव्हर्सिटीमधून लिबरल आर्ट्स आणि टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे.

लिंडा याकारिनो यांनी टर्नर कंपनीत 19 वर्षे काम केले, जिथे तिने कार्यकारी उपाध्यक्ष/सीओओ जाहिरात विक्री, पदावर काम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT