Intel headquarters under spotlight as company announces plan to lay off 24,000 employees globally by 2025.  esakal
ग्लोबल

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Intel Job Cuts: मोठे प्रोजेक्ट्सही बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या, नवीन सीईओंनी काय म्हटलंय?

Mayur Ratnaparkhe

Intel announces massive layoffs: संगणकामधील चिप बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणारी, अमेरिकेची इंटेल ही कंपनी कठीण काळातून जात आहे. अशातच कंपनीत काही मोठे बदलही झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. लिप-बू-टॅन यांना नवीन सीईओ बनवलं गेलं आहे. अपेक्षा आहे की, काहीतरी चमत्कार घडेल कंपनी पुन्हा सुरळीत चालेल.

असे असतानाच आता नवीन इंटेलचे नवीन सीईओ लिप-बू-टॅन यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा म्हणजे कंपनीने अशी घोषणा केली आहे की, यावर्षी किमान २४ हजार कर्माचाऱ्यांना कामावरून काढण्यात येईल. ही संख्या २०२४ च्या अखेरपर्यंतच्या एकूण कर्मचारी संख्येच्या एक चतुर्थांश इतकी आहे. ही बातमी इंटेलच्या दुसऱ्या तिमाहीच्या २०२५ च्या कमाईच्या अहवालादरम्यान आली आहे.

इंटेल आता स्वतःला लहान आणि अधिक कार्यक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करेल. या धोरणाअंतर्गत आता, कंपनीने जर्मनी आणि पोलंडमधील त्यांचे मोठे प्रोजेक्ट रद्द केले आहेत. तसेच कंपनी कोस्टा रिकामधील काही कामकाज बंद करून व्हिएतनामला हस्तांतरित करत आहे. या निर्णयामुळे कोस्टा रिकामधील सुमारे २००० कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. द व्हर्जच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.

कंपनीचे नवीन सीईओ लिप-बू टॅन यांनी मान्य केले आहे की, इंटेलने चिप्सच्या मागणीचा योग्य अंदाज न घेता नवीन प्रोजेक्ट्स उभारण्यात खूप पैसे खर्च केले आहेत. तसेच टॅन यांनी गुंतवणूकदारांशी झालेल्या संभाषणात म्हटले आहे की, "मी गोष्टी बांधण्यात आणि ग्राहक येण्याची अपेक्षा करण्यावर विश्वास ठेवत नाही. आता आम्ही लोकांना खरोखर जे हवे आहे ते बनवू".

या मोठ्या बदलात कंपनीला खूप खर्च करावा लागत आहे. नोकऱ्या काढून टाकण्यासाठी आणि पुनर्रचनेसाठी सुमारे 2 अब्ज डॉलर खर्च येईल आणि कंपनी अजूनही तोट्यात आहे. इंटेलने तिमाहीत 12.9 अब्ज डॉलर उत्पन्नासह 2.9 अब्ज डॉलर गमावले. तथापि, इंटेलचे काही युनिट्स चांगले काम करत आहेत. सर्व्हर आणि क्लाउड सर्विसला बळकटी  देणारे त्यांचे डेटा सेंटर युनिट वाढले आहे. परंतु नियमित संगणकांसाठी बनवलेल्या चिप्स पूर्वीइतक्या विकल्या जात नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT