us. 
ग्लोबल

अमेरिकेच्या दूतावासावर डागले 3 रॉकेट; एका आठवड्यात तिसरा हल्ला

सकाळन्यूजनेटवर्क

बगदाद- इराकची राजधानी बगदादमध्ये सोमवारी अमेरिकी दूतावासावर तीन रॉकेट डागण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील 2 रॉकेट ग्रीन झोनमध्ये पडले असून इतर एक निवासी भागात पडले आहे. विशेष म्हणजे पश्चिमी देशांचे कार्यालय, लष्कर आणि वाणिज्य संस्थांवर झालेला हा एका आठवड्यातील तिसरा हल्ला आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

इराकी सैन्याने यावर वक्तव्य करताना म्हटलंय की, रॉकेट हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रीन झोनमध्ये अनेक विदेशी दूतावास आणि सरकारी इमारती आहेत. हा भाग नेहमी रॉकेट हल्ल्यानी टार्गेट केला जातो. अमेरिका आणि इराकी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे हल्ले इराण पुरस्कृत आहेत. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराणमधील संबंध अधिक बिघडले जाणार आहे. इराकचा लष्कर प्रमुख कासीम सुलेमानी याचा अमेरिकेने केलेल्या रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाला होता. तेव्हापासून दोन्ही देशातील संबंध चिघळले गेले आहेत. 

इराकी सेक्युरिटी सर्विसकडून सांगण्यात आलंय की, कमीत कमी दोन रॉकेट ग्रीन झोनमध्ये पडले आहेत. याठिकाणी अमेरिका आणि इतर विदेशी देशांचे दूतावास आहेत. एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितलं की, एका रॉकेटने अमेरिकी डिप्लोमॅटिक मिशनला निशाणा बनवलं आहे. अन्य रॉकेट निवासी क्षेत्रात पडले आहेत.

एक आठवड्यापूर्वी अरबिल एअरपोर्टवरील मिलिट्री कॉम्पेल्कसवर जवळपास दोन डझन रॉकेट्स डागण्यात आले होते. याठिकाणी विदेशी सैनिक राहतात. या हल्ल्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका विदेशी कंत्राटदाराचा आणि एका नागरिकाचा समावेश होता.  2014 पासून जिहादींविरोधात लढा देण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वात सैन्य इराकची मदत करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT