Iran to attack Israel conflict between iran and israel us issues travel instruction know what could happen next marathi news
Iran to attack Israel conflict between iran and israel us issues travel instruction know what could happen next marathi news  
ग्लोबल

Iran to attack Israel : इराण खरंच हल्ला करणार? भीतीपोटी इस्राइलपासून अमेरिकेपर्यंत दहशतीचे वातावरण, पुढे काय होणार?

रोहित कणसे

Iran to attack Israel Latest News : पश्चिम आशियामध्ये युद्ध पेटण्याची शक्यता असून इराणकडून हल्ला होण्याच्या भीतीपोटी अमेरिकेकडून आपल्या अधिकाऱ्यांना इस्त्राइलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, ११ दिवसांपूर्वी सीरियामध्ये इराणच्या वाणिज्य दुतावासावर इस्त्राइलने हल्ला केला होता, याचा बदला घेण्यासाठी इराण इस्त्राइलवर भीषण हल्ल्याची योजना आखत आहे. या पार्श्वभूमीवर बायडन प्रशासनाने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना इस्त्राइलमध्ये जाण्यापासून रोखले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी चीन, तुर्की, सौदी अरेबिया आणि इतर युरोपीय देशांमधील त्यांच्या समकक्ष नेत्यांशी चर्चा केली, यामध्ये त्यांनी इराणला इस्त्राइलवर हल्ला करण्यापासून रोखण्यास सांगीतले. तसेच त्यांनी सांगितले की, असा हल्ला करणे कोणाच्याच फायदेचे नसेल. या देशांनी इराणकडे हल्ला करू नये यासाठी आग्रह करण्याची गरज आहे.

दरम्यान इस्राइलने सीरियातील दमास्कस येथे हवाई हल्ला करत इराणच्या वाणिज्य दूतावासाला लक्ष्य केले. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर इराणकडून बदला घेणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. १ एप्रिल रोजी झालेला हवाई हल्ल्यात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या कुड्स फोर्समधील दोन जनरल आणि इतर पाच अधिकारी मारले गेले होते. तसेच हा हल्ला, राजनयिक एन्क्लेव्हमध्ये घडला होता. विशेष बाब म्हणजे इस्राइलने यापूर्वी दमास्कस तसेच इतर कुठल्याही दुतावासावर हल्ला केला नव्हता.

या एअर स्ट्राइकनंतर, इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियान यांनी इस्राइलला याची शिक्षा मिळेल आणि इराणच्या दूतावासावरील हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार असून यासाठी त्यांना जबाबदार धरले पाहिजे असे विधान केले होते.या

दमास्कसमधील प्राणघातक इस्राइली हवाई हल्ल्याचा जर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने निषेध केला असता, तर इराणची सैन्य प्रतिक्रिया टाळता आली असती अशी भूमिका गुरुवारी, युनायटेड नेशन्समध्ये इराणने घेतली होती.

मात्र आथा इस्रायली हवाई हल्ला आणि त्यानंतरच्या प्रत्युत्तर म्हणून इराणच्या हल्ला करण्याच्या धमक्यांनंतर, यूएस गुप्तचर संघटनांनी माहिती दिली आहे की, इराण इस्राइलमधील अनेक ठिकाणांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे किंवा ड्रोन वापरून हाय इंटेंसीटी हल्ले करण्याच्या तयारीत आहे. तसेच या रिपोर्टमध्ये इराण हल्ला नक्की करेल असे सांगण्यात आले असून इराणचा हल्ला थेट असेल की आपल्या प्रॉक्सी नेटवर्कच्या माध्यमातून असेल याबद्दल स्पष्टता नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अमेरिकन गुप्तचर संस्थांचा हवाला देत ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, इराण तेल अवीवमधील इस्राइली लष्करी मुख्यालय किरियाला लक्ष्य करण्याची योजना आखत आहे. रिपोर्टनुसार, मध्य इस्रायलमधील पाल्माचिम किंवा उत्तरेकडील मेरॉनमधील हवाई तळ तसेच नेसेट (इस्त्रायली संसद) आणि जेरुसलेममधील पंतप्रधान कार्यालय हे इतर संभाव्य टार्गेट असू शकतात.

वॉल स्ट्रीट जर्नलने देखील वृत्त दिले आहे की इस्राइल देखील पुढील २४ ते ४८ तासात इराणच्या दक्षिण किंवा उत्तर इस्राइलवर होणाऱ्या संभावित थेट हल्ल्यांना रोखण्याची तयारी करत आहे.

इराण इस्राइलवर कसा हल्ला करू शकतो?

अधिकाऱ्यांचे मत आहे की इराण इस्राइलवर थेट हल्ला करणार नाही, कारण त्याला थेट युद्ध मानले जाईल आणि इस्त्राइलला उत्तरादाखल हल्ला करण्याचा अधिकार मिळून जाईल. अमेरिकेने आधीच स्पष्ट केले आहे की अशा परिस्थितीत अमेरिका इस्त्राइलच्या बाजूने उभा राहील. अशा परिस्थितीत, इराण त्याच्याकडे असलेल्या बॅलिस्टिक लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इराणकडे दुसरा पर्याय देखील असून इराण त्यांचे प्रॉक्सी, जसे की हमास, हिजबुल्ला, कातिब हिजबुल्ला, हुती आणि बद्र या संघटानंचा वापर करू शकतो. दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाकडे क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे ज्याचा वापर ते इस्राइलला लक्ष्य करण्यासाठी करू शकतात. एकंदरीत जगाच्या या भागात पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची चिन्हे आहेत. यामुळे इराण आणि इस्त्राइल यांच्यात युद्ध पेटल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होणार आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT