Israel_Hamas 
ग्लोबल

Israel-Hamas War: हमासजवळ केमिकल हत्यारं! इस्राइलचा खळबळजनक दावा; जगावर भीषण संकट

किबुत्जच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Israel-Hamas War: ड्रोन अन् हवाई हल्ल्यांनी सुरु झालेल्या इस्राइल-हमासमधील युद्ध आता केमिकल शस्त्रांच्या दिशेने वाटचाल करत आहे. कारण इस्राइलनं याबाबत मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. यामुळं जगावर भीषण संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Israel Hamas War Chemical weapons Israel Sensational Claim terrible crisis on world)

हमासकडं केमिकल हत्यारं

इस्राइलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी दावा केला की, हमासच्या ज्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी म्युझिक फेस्टिव्हलवर हल्ला केला होता. त्यांना केमिकल हत्यारं बनवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

इस्राइली सैन्याच्या माहितीनुसार, किबुत्जच्या म्युझिक फेस्टिवलमध्ये कत्तली करणारे काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यांचे मृतदेह जेव्हा बारकाईनं तपासण्यात आले तेव्हा त्यांच्याजवळून केमिकल हत्यारं बनवण्याचं सामान आढळून आलं. यामध्ये सायनाईड या विषारी केमिकलचाही समावेश आहे.

खतरनाक परिणाम

इस्राइलच्या राष्ट्रपतींचा दावा यासाठी धक्कादायक ठरतो की, इतिहासात जेव्हा जेव्हा दहशतवाद्यांच्या हातात भयनाक हत्यारं पडली तेव्हा त्याचे खूपच खतरनाक परिणाम दिसून आले आहेत. त्याचबरोबर इस्राइलच्या राष्ट्रपतींनी आणखी एक मोठा खुलासा केला. (Latest Marathi News)

यामध्ये त्यांनी दावा केला की, केमिकल हत्यारं बनवण्याचं जे सामान हमासच्या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलं आहे, त्यांचं कनेक्शन अलकायदा सोबत आहे. हा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक कागदही मीडियासमोर सादर केले आहेत. (Marathi Tajya Batmya)

यापूर्वीही वापरलेत हत्यारं

पण पहिल्यांदाचं दहशतवाद्यांच्या हातात अशा प्रकारचं केमिकल हत्यारं लागली आहेत. यापूर्वी इसिसपासून अल कायदापर्यंतच्या दहशतवाद्यांनी केमिकल हत्यारांचा वापर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : तिघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा खात्मा, पिंपरखेडमध्ये शार्पशूटरने झाडल्या गोळ्या

Pune Weather : पुणे गारठणार! पुढील 3-4 दिवसांत तापमानात मोठी घट; हवामान विभागाचा अंदाज

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

SCROLL FOR NEXT