italy 
ग्लोबल

धक्कादायकच! इटली म्हणतेय,'कोरोनामुळे भाषेवर होतंय नकोसं आक्रमण'

सकाळ वृत्तसेवा

रोम, ता. ९ (वृत्तसंस्था) : जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. लोकांचे जीवन धोक्यात आलं असताना इटलीला मात्र कोरोनामुळे त्यांच्या भाषेवर होणाऱ्या आक्रमणाची चिंता लागली आहे. कोरोनाच्या जागतिक साथीत अनेक इंग्रजी शब्द परवलीचे झाले आहेत. पण, हे शब्द म्हणजे इटालिन भाषेवर नकोसे असणारे आक्रमण आहे, अशी भावना तेथील भाषातज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

इटलीमधील भाषेची शुद्धता जतन करण्याचे काम करणारी ‘अकॅडेमिया डेला क्रुस्का’ या संस्थेचे अध्यक्ष क्लाउडीओ मराझ्झिनी यांनी कोरोना काळातील ‘लॉकडाउन’, ‘ड्रॉपलेट’, ‘स्मार्ट वर्किंग’ आणि ‘रिकव्हरी फंड’ अशा इंग्रजी शब्दांवर प्रकाश टाकला. इंग्लिशवादाचा अंगीकार हा कोरोना व्हायरसचा दुसरा धोका आहे, असे ते म्हणाले. ‘युनायटेड किंगडम’च्या भाषेचा वापर आम्ही इटलीतील नागरिक अगदी सहज करीत असलो, तरी संपूर्ण देशात इंग्रजी शब्द नकोसे झाले आहेत. 

इंग्रजी शब्दांचे हे अतिक्रमण फ्रान्स आणि स्पेनने प्रभावीपणे रोखले आहे. त्यांनी ‘लॉकडाउन’ला ‘कन्फाइन्मेंट’ किंवा ‘कन्फाइनामिंटो’ हे पर्यायी शब्द वापरले आहेत. इटली ‘कन्फाइनामिंटो’ या शब्दाचा वापर करू शकते. पण, आता त्याला खूप उशीर झाला आहे, असे मराझ्झिनी म्हणाले. फ्रान्समध्ये ‘ॲकॅडमी फ्रान्सिस’ आणि ‘कमिशन फॉर द फ्रेंच लँग्वेज’ या दोन संस्थांकडून विदेशी भाषेच्या अतिक्रमणापासून स्वदेशी भाषेचे रक्षण केले जाते. त्या देशातील कर्मचाऱ्यांना ‘क्लिकबाइट’ आणि ‘फेक न्यूज’ असे शब्द वापरण्यास मनाई आहे. 

‘लाव्होरो एजिल’चा वापर 
पर्यायी शब्द उपलब्ध नसताना इंग्रजी शब्दांवर बंदी आणण्यास काही अर्थ नाही. पण, इटलीतील नोकरशाही ‘लाव्होरो एजिल’ (फ्लेक्झिबल वर्किंग) हा शब्द आधीपासून वापरत आहे. कोरोनाच्या साथीतही हा शब्द ‘स्मार्ट वर्किंग’ला पर्याय ठरला आहे, असे क्लाउडीओ मराझ्झिनी यांनी सांगितले. 

अमेरिकेत कोरोनाचा कहर होण्यापूर्वी इटलीला सर्वात मोठा दणका बसला आहे. इटलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 235000 इतकी असून आतापर्यंत 167000 रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. कोरोनामुळे इटलीत मृत्यू झालेल्यांची संख्या 33,964 इतकी आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT