Scene outside Kapil Sharma’s ‘Kaps Caffe’ in Canada after the third firing incident reportedly linked to the Lawrence gang.

 
esakal
ग्लोबल

Kapil Sharma Cafe Firing VIDEO : कॅनडात कपिल शर्माच्या ‘Kaps Caffe’वर तिसऱ्यांदा गोळीबार ; लॉरेन्स गँगने घेतली जबाबदारी!

Kapil Sharma cafe shooting in Canada Lawrence gang claims responsibility : सोशल मीडियावर पोस्ट करून गोळीबाराची जबाबदारी घेत, इशाराही दिला आहे; जाणून घ्या, नेमकं काय म्हटलंय.

Mayur Ratnaparkhe

Kapil Sharma’s ‘Kaps Caffe’ in Canada Attacked Again : कॅनडात कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. याआधीही कपिल शर्माच्या कॅफे कॅप्सवर दोनदा गोळीबार झालेला आहे. याचा अर्थ आजची गोळीबाराची घटना पकडून एकूण तीनदा कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाला आहे.

विशेष म्हणजे यावेळीही कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओही समोर आलेला आहे. तर या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगशी निगडीत असणाऱ्या गोल्डी ढिल्लो आणि कुलदीप सिद्धू नेपाळीने घेतली आहे.

सोशल मीडिया पोस्ट लिहून लॉरेन्स गँगने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, वाहेगुरूजी का खालसा, वाहेगुरूजी की फतेह...आज जो तीनदा गोळीबार झाला आहे, त्याची जबाबदारी मी कुलवीर सिद्धू आणि गोल्डी ढिल्लो घेत आहोत. आमचे सामान्य जनतेशी कोणतेही वैर नाही. ज्यांच्याशी आमचा वाद आहे, त्यांनी आमच्यापासून दूर रहावेत. 

सोशल मीडिया पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, जे लोक अवैध कामं करतात, लोकांकडून काम करून घेऊन पैसे देत नाहीत, त्यांनीही तयार रहावं. जे कोणी बॉलीवूडमध्ये धर्माविरोधात बोलत असतील, त्यांनीही तयार रहावं. गोळी कुठूनही येऊ शकते. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह..

याआधी ७ ऑगस्ट रोजीही देखील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाला होता. तेव्हा ९ सेकंदाच्या गोळीबाराचा एक व्हिडिओ समोर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT