khalistani extremist nijjars killing s jaishankar speaks to pm modi amid row with canada Sakal
ग्लोबल

S Jaishankar : नेमकी माहिती द्या त्यावर विचार करू ; निज्जरच्या हत्येवरून जयशंकर यांचे स्पष्टीकरण

निज्जर हत्याप्रकरणात भारत सरकारचा हात असल्याचा कॅनडाचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : कॅनडामधील खलिस्तानवाद्याच्या हत्येत भारत सरकारचा सहभाग असल्याच्या आरोपावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले असतानाच, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी, ‘हे काही आमचे धोरण नाही,’ असे स्पष्ट केले आहे, तसेच या प्रकरणी परिस्थितीजन्य आणि नेमकी माहिती पुरविल्यास त्याचा विचार करण्याची भारताची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

निज्जर हत्याप्रकरणात भारत सरकारचा हात असल्याचा कॅनडाचा आरोप आहे. जयशंकर यांनी काल (ता. २६) संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण करताना कॅनडाला फटकारले होते. दहशतवादाविरोधात लढाई लढताना राजकीय सोय पाहिली जाऊ नये, असे त्यांनी सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर त्यांनी आज परराष्ट्र व्यवहार परिषदेमध्ये बोलताना भारताची बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘आमची भूमिका आम्ही कॅनडा सरकारला स्पष्टपणे सांगितली आहे. निज्जरच्या हत्येत भारतीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

मात्र, हा प्रकार भारत सरकारच्या धोरणाचा भाग नाही, असे आम्ही कॅनडा सरकारला सांगितले आहे. तसेच, कॅनडाजवळ काही ठोस व नेमकी असल्यास त्यांनी ती आम्हाला सांगावी, आम्ही त्याचा विचार करू.’’ तसेच, या प्रकरणाचा विचार करताना घटनेमागील पार्श्वभूमीही समजावून घेणे आवश्‍यक असल्याचे मत जयशंकर यांनी व्यक्त केले.

‘कॅनडामधील परिस्थितीच तशी’

जयशंकर म्हणाले, ‘‘कॅनडामध्ये मागील काही वर्षांपासून फुटीरतावादाशी संबंधित असलेली संघटित गुन्हेगारी वाढली आहे. शिवाय, हिंसाचार आणि कट्टरतावाद वाढल्याचेही दिसून आले आहे. या सर्व समस्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. आम्ही या संघटित गुन्हेगारी टोळ्यांबद्दल भरपूर माहिती कॅनडाला पुरविली आहे.

अनेक जणांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही अर्ज केले आहेत. अनेक दहशतवाद्यांची ओळखही पटली आहे. यामुळे कॅनडामध्ये सध्या कसे वातावरण आहे, हे सर्वांनी समजून घ्यावे. तिथे काय घडामोडी घडत आहेत हे सर्वांना समजणे आवश्‍यक आहे. कॅनडामध्ये आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धमक्या मिळतात, आमच्या दूतावासांवर हल्ले होतात आणि आमच्या राजकारणात हस्तक्षेपही होतो, तरीही लोकशाहीच्या नावाखाली हे सर्व खपवून घेतले जाते.’’

‘पुढील २५ वर्षे अमृतकाल’

आगामी २५ वर्षे हा भारताचा अमृतकाल असेल आणि या काळात भारत हा विकसित देश बनेल, असा विश्‍वास परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. माझे विधान तर्कसंगत असून भारत हा जागतिक शक्ती म्हणूनही उदयाला येईल, असेही जयशंकर म्हणाले. परराष्ट्र व्यवहार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला.

‘‘भारत हा जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. भविष्यात अनेक देश आमच्या अधिक जवळ येणार आहेत. भारताच्या विकासाबरोबर या देशांचाही विकास होणार आहे,’’ असे जयशंकर यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT