Killed after torture Ukrainian women Killed after torture Ukrainian women
ग्लोबल

युक्रेनच्या महिलांवर बलात्कार केल्यानंतर केले ठार; डॉक्टरांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन आणि रशिया (russia) यांच्यात अजूनही युद्ध सुरू आहे. अनेक प्रयत्न करूनही तोडगा निघालेला नाही. युद्धात अनेकांचा जीव गेला आहे. कबरीतून मृतदेह काढून शवविच्छेदन केले जात आहे. यावेळी हृदयद्रावक वास्तव समोर आले आहे. ज्या महिलांचे मृतदेह कबरीतून बाहेर काढले जात आहेत. त्यांच्यावर प्रथम बलात्कार करण्यात आला नंतर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळ्या घालण्यात आल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. (Killed after torture Ukrainian women)

युक्रेनमध्ये (Ukraine) सर्वत्र सामूहिक स्मशानभूमी आढळतात जिथे अनेक लोक मारले गेले आणि दफन केले गेले. प्रथम बुचा शहरात एक सामूहिक स्मशानभूमी सापडली आणि आता अशीच आणखी एक सामूहिक स्मशानभूमी राजधानी किव्हपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर सापडली आहे. युक्रेनियन फॉरेन्सिक डॉक्टर ब्लाडिस्लाव्ह पेरोव्स्की आणि त्यांची टीम किव्ह जवळ सामूहिक कबरीत सापडलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन करीत आहेत.

ज्या युक्रेनियन (Ukraine) महिलांना ठार करून पुरण्यात आले होते, त्यांच्यावर आधी बलात्कार (Rape) झाला होता. यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाहीत कारण अनेक मृतदेहांची तपासणी करून डेटा तयार करायचा आहे, असे डॉ. ब्लाडिस्लाव्ह म्हणाले. डॉ. ब्लाडिस्लाव आणि त्यांचा चमू बुचा, इरपिन आणि बोरोडियान्का या शहरांमधून सापडलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन करीत आहेत. या ठिकाणी रशियन (russia) सैनिकांनी नरसंहार केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. ब्लादिस्लाव आणि त्यांची चमू दररोज १५ मृतदेहांचे शवविच्छेदन करतात. यातील अनेक मृतदेह कुजले असून त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. असे अनेक मृतदेह आहेत ज्यांची ओळख पटवणे अशक्य आहे. अनेकांचे चेहरे खराब झाले आहेत. त्यांच्या मृतदेहाचे अवशेष जोडावे लागतील. कधी कधी असा मृतदेहही सापडतो ज्याला डोके नसते, असे द गार्डियनला डॉ. ब्लाडिस्लाव्ह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT