Wealthiest Royal Families
Wealthiest Royal Families Sakal
ग्लोबल

Wealthiest Royal Families: आज राजा चार्ल्सचा होणार राज्याभिषेक, किती आहे ब्रिटनच्या राजघराण्याची संपत्ती?

राहुल शेळके

Wealthiest Royal Families: ब्रिटनमध्ये आजपासून एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. आज राजा चार्ल्सचा राज्याभिषेक होणार आहे. ब्रिटनमध्ये गेल्या 70 वर्षांतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाबाबत नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

ब्रिटनच्या राजघराण्याचा समावेश जगातील पाच श्रीमंत राजघराण्यांमध्ये होतो. जगातील पाच श्रीमंत राजघराण्यांपैकी चार अरब देशांतील आहेत. या यादीत स्थान मिळवणारे एकमेव बिगर अरबी कुटुंब म्हणजे ब्रिटिश राजघराणे. जाणून घ्या जगातील पाच श्रीमंत राजघराण्यांकडे किती संपत्ती आहे.

सौदी अरेबियाचे राजघराणे (संपत्ती 1.4 ट्रिलियन डॉलर)

सौदी अरेबियाचे राजघराणे 1744 पासून सौदी अरेबियावर राज्य करत आहे. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. एका अंदाजानुसार, कुटुंबाची एकूण वैयक्तिक संपत्ती सुमारे 1.4 ट्रिलियन डॉलर म्हणजे सुमारे 111 लाख कोटी रुपये आहे.

हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्टपेक्षा सुमारे सात पट जास्त आहे. अर्नॉल्टची एकूण संपत्ती सध्या 206 अब्ज डॉलर आहे. या राजघराण्यात अनेक सदस्य असले तरी किंग सलमान अल सौद यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे.

कुवेतचे राजघराणे (360 अब्ज डॉलर)

आखाती देश कुवेतचे राजघराणे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत राजघराणे आहे. त्याचे प्रमुख कुवेतचे वर्तमान अमीर शेख सबाह अहमद अल जाबेर अल सबाह आहेत. अल सबाह राजवंश 1752 पासून कुवेतवर राज्य करत आहे.

या राजघराण्याने अमेरिकेतील सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून अमाप संपत्ती कमावली आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 360 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अर्नॉल्टच्या संपत्तीपेक्षा ही 154 अब्ज डॉलर अधिक आहे.

कतारचे राजघराणे (335 अब्ज डॉलर)

कतारचे राजघराणे जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कतारवर 19व्या शतकाच्या मध्यापासून थानी घराण्याचे राज्य आहे. शेख तमीम बिन हमाद अल थानी, 2013 मध्ये सिंहासनावर आरूढ झाले. या कुटुंबाची संपत्ती 335 अब्ज डॉलर आहे.

त्यांनी अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये लंडनमधील ऑलिम्पिक व्हिलेज आणि हॅरॉडचे लंडनमधील डिपार्टमेंटल स्टोअर यांचा समावेश आहे. न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंग, बार्कलेज, ब्रिटिश एअरवेज आणि फोक्सवॅगनमध्येही या कुटुंबाची गुंतवणूक आहे.

अबू धाबीचे राजघराणे (150 अब्ज डॉलर)

अबुधाबीवर अल नाह्यान घराण्याची सत्ता आहे. या राजघराण्याचे प्रमुख शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान हे अबू धाबीचे 2004 पासून UAE चे अध्यक्ष आहेत.

अबू धाबीच्या राजघराण्याची एकूण संपत्ती 150 अब्ज डॉलर आहे. ते बहुतेक तेलातून येते. त्यांच्याकडे लंडनमध्ये 7.1 अब्ज डॉलर्सची स्थावर मालमत्ता आहे. जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांच्या यादीत हे कुटुंब चौथ्या क्रमांकावर आहे.

ब्रिटनचे राजघराणे (88 अब्ज डॉलर)

ब्रिटिश राजघराण्याची कमान आता राजा चार्ल्सच्या हाती आहे. हे कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असले तरी जगातील सर्वात प्रभावशाली राजघराणे आहे.

फोर्ब्सच्या अहवालानुसार, ब्रिटिश राजघराण्याकडे सुमारे 88 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. याशिवाय, राजघराण्याने अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्येही गुंतवणूक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT