ग्लोबल

'लेडी जेम्स बॉंड' शुलामित: एका हाताने पाळणा अन् दुसऱ्या हाताने संपूर्ण जग हलवणारी गुप्तहेर

सुस्मिता वडतिले

इस्रायलची गुप्तहेर असलेल्या शुलामित 14 वर्षे लेबनानमध्ये राहिल्या. या कालावधीत त्यांनी मोठमोठ्या नेत्यांशी जवळीक साधली आणि आपलं नेटवर्क तयार केलं. शुलामित कोहेन-किशिक यांना स्वतःला 'शुला' याच नावाने हाक मारलेली खूप आवडायची.

पुणे : जेरुसलम- इस्त्रायल या ज्यू राष्ट्राला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने शत्रू देशाशी दोन हात करावे लागलेत. मोसाद या इस्त्रायलच्या गुप्तहेर संघटनेचं जगभरात नाव आहे. मोसादचे गुप्तहेर जवळपास सर्वत्र पसरलेले आहेत. या गुप्तहेरांच्या शौर्य कथा अंगावर काटा आणणाऱ्या असतात. अशीच एक कथा आहे लेडी जेम्स बॉंड (lady James Bond) म्हणून ओळख असलेली शुलामित कोहेन-किशिक (Shulamit Cohen-Kishik) यांची. असं म्हटलं जातं की त्या एका हाताने पाळणा हलवतं होत्या आणि दुसऱ्या हाताने संपूर्ण जग. इस्रायलची गुप्तहेर असलेल्या शुलामित 14 वर्षे लेबनानमध्ये राहिल्या. या कालावधीत त्यांनी मोठमोठ्या नेत्यांशी जवळीक साधली आणि आपलं नेटवर्क तयार केलं. शुलामित कोहेन-किशिक यांना स्वतःला 'शुला' याच नावाने हाक मारलेली खूप आवडायची. (Know about lady James Bond' Who Spied for Israel)

1917 मध्ये अर्जेंटिनामध्ये किशिक कुटुंबात जन्मलेल्या भावी गुप्तहेर शुलामित यांचे वडील दमास्कसचे रहिवासी होते. 1920 च्या दशकात, किशिक-कोहेन यांचे कुटुंब दक्षिण अमेरिकेतून जेरुसलेममध्ये गेले, जेथे शुलामित यांनी प्रतिष्ठित इव्हिलीना डी रॉथस्लाईल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांच्या आई-वडिलांनी त्याचं लग्न बेरूत येथील एका श्रीमंत व्यक्ती सोबत लावून दिले, ज्याचे वय त्यांच्या वयाच्या दुप्पट होते. "मी ती संपूर्ण रात्र रडत होते," असे या प्रसंगाबद्दल शुलामित सांगतात.

इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या कारनाम्यासंदर्भात दिलेल्या निवेदनात "अरब देशातील यहुदी लोकांचे जीव वाचवणारी" असा संदर्भ दिला. इतरत्र त्यांना "शौर्याची एक आख्यायिका" म्हटले जाते. मात्र त्यांची नातवंडे त्यांना 'लेडी जेम्स बॉंड' म्हणणं जास्त पसंद करतात. 1948 ते 1961 या काळात शुलामित किशोर-कोहेन यांनी लेबनॉनमध्ये इस्रायलसाठी 14 वर्षे हेरगिरी केली. 1961 मध्ये अखेर त्यांना अटक करण्यात आली आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा सरकारी वकिलांनी सांगितले की त्या 'एका हाताने पाळणा हलवित आहे आणि दुसऱ्या हाताने संपूर्ण जगाला हलवत आहे.'

इस्रायलच्या इंटेलिजेंस हेरिटेज सेंटरच्या संकेतस्थळानुसार "शूला कोहेन यांनी लेबनॉनच्या लष्करी कारवायांशी संबंधित प्रत्येक गोष्टीची माहिती पुरवली. आपल्या अस्तित्वासाठी लढा देणाऱ्या आणि तरुण देशाला महत्वाची गुप्त माहिती त्यांनी दिली होती. "यहुद्यींना वाचवण्यासाठी त्यांना गुप्तहेराच्या कामासाठी इंटेलिजन्स कॉर्पोरेशनच्या युनिट 504 द्वारे प्रशिक्षण देऊन तयार केले गेले होते. लेबनॉन आणि अरबमधील ज्यूंना इस्त्रायलमध्ये पाठवण्याचं काम ती गुप्तपणे आणि हिंमतीने ती पार पाडत असे.

'मी दक्षिणेतील 70 ज्यू मुलांना सीमेच्या मार्गे इस्त्रालयमध्ये पाठवणार होते. त्यासाठी बसची व्यवस्था केली होती. परंतु बस सुटण्याच्या अगदी अगोदरच लेबनीज गुप्तहेर मुलांवर पाळत ठेवत असल्याचं मला समजलं. मी किराणा दुकानातून 70 मेणबत्त्या विकत घेतल्या आणि त्या मुलांना दिल्या. गुप्तहेरांना आम्ही लेबनॉनमध्ये सुरु असणाऱ्या हनुक्का मोर्चासाठी जात असल्याचं भासवलं. त्यासाठी मुलांना हनुक्काचे गाणे म्हणण्यास मी सांगितलं. लेबनॉन गुप्तहेरांना आम्ही हनुक्का मोर्चासाठी जात असल्याची खात्री पटली. त्यामुळे त्यांनी बसला पुढे जाण्यास परवानगी दिली. हा एक हनुक्का चमत्कारच होता, असं शुलामित सांगतात.

1962 मध्ये शुलामित यांना अटक करण्यात आली. 1967 मध्ये सहा दिवसांच्या युद्धानंतर शेकडो लेबनॉनींच्या बदल्यात किसिक-कोहेनला सोडण्यात आले. त्या सन्मानाने आपल्या कुटुंबासमवेत जेरुसलेमला परत आल्या. इस्रायलमध्ये त्यांनी पुरातन वस्तू आणि दागिने विकणाऱ्याच्या दुकानात कारकुनाचे काम केले. जेरुसलेम नगरपालिकेने त्यांचा ‘याकीर येरुशायम नागरिकत्व’ पुरस्काराने गौरव केला. इस्रायलच्या स्वातंत्र्य दिनासाठी मशाल लाईटर्सपैकी एक होण्याचा मान त्यांनाही देण्यात आला. 1994 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुले आणि बारा नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.

21 मे 2017 रोजी वयाच्या 100 व्या वर्षी जेरुसलेमध्येच त्यांटे निधन झाले. शुला कोहेन आज जिवंत नसल्या तरी त्यांनी देशासाठी केलेले काम कधीच विसरले जाऊ शकत नाही. त्यांची मुले आणि नातवंडे देखील आज इस्राईलमध्ये मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. त्यांच्या मुलांनी तर त्यांना 'लेडी जेम्स बॉंड' ची पदवीही दिली आहे. (Know about lady James Bond' Who Spied for Israel)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT