joe biden
joe biden 
ग्लोबल

US President Election : जाणून घ्या कोण आहेत जो बायडेन?

सकाळवृत्तसेवा

सरतेशेवटी अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. डेमोक्रॅटीक पक्षाच्या ज्यो बायडेन यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. सोबतच अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्षा म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची इतिहासात नोंद झाली आहे. 290 इलेक्टोरल व्होट्सनी जो बायडेन यांनी बाजी मारली आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ 214 च इलेक्टोरल व्होट्स प्राप्त झाले आहेत. पण कोण आहेत जो बायडेन? कशी राहिलीय त्यांची राजकीय कारकिर्द? आपण हेच जाणून घेणार आहोत. 

अमेरिकेची सर्वांत जुनी आणि मजबूत लोकशाही...
अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालाचं घोगडं भिजत पडलं होतं तेंव्हा बऱ्याच जणांना असं वाटत होत की, अमेरिकेसारखा विकसित देश आणि तिथंही निकाल लागायला इतक्या भानगडी आणि इतक्या उठाठेवी... पण या भानगडी आणि उठाठेवी नाहीयेत तर लोकशाही पारदर्शकपणे राबवली जाण्याचे प्रात्यक्षिकच होते. प्रत्येक बॅलेट पेपर मोजला जावा याचा अट्टहास... भलेही निकाल लागायला वेळ लागो... खोटं बोलताहेत म्हणून अमेरिकन न्यूज चॅनेल्सनी डोनाल्ड ट्रम्प यांचं थेट लाईव्ह टेलिकास्ट बंद करणं आणि राज्यांनी आपले अधिकारक्षेत्र ठणकावून सांगत कोर्टात गेलेल्या ट्रम्प यांच्यासमोरही मान न तुकवता... आपलं काम पार पाडणं... ही वैशिष्ट्ये आहेत... म्हणूनच यशस्वीरित्या अमेरिकेची लोकशाही इतके दशकं अबाधित आहे. 

कोण आहेत जो बायडेन?
चिकाटी आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी न हरता अविरत प्रयत्न केले की, हवे ते निश्‍चित मिळते, नव्हे मिळवता देखील येते हे जर कोणी सिद्ध केले असेल तर अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी. बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात दोनदा उपाध्यक्षपदी राहिलेल्या बायडेन यांनी १९८७ आणि २००८ असे दोनदा अध्यक्षपदासाठी लढण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नांत ते त्यांनी हाशील केले. रिपब्लिकन उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रसताळे प्रचार, वादग्रस्त विधाने, बेछूट आरोप, काहीही झाले तरी अध्यक्षपद मिळवायचे, मग त्यासाठी लोकशाही संकेत, शिष्टाचार धुडकावायचे धोरण होते. त्या तुलनेत बायडेन यांचा प्रचार आणि निकालाबाबत औत्सुक्‍य असतानाही संयमाने सगळ्या आरोप-प्रत्यारोपातही सामोरे जाणे उठून दिसले. हेच त्यांचे बळ ठरले. त्यांनी बऱ्यापैकी काळ राजधानी वॉशिंग्टनमध्ये घालवलेला आहे. त्यांच्याकडे सिनेटवरचे प्रदीर्घ काम, राजकारणातील सक्रिय पन्नास वर्षे, न्याय, सामाजिक कल्याण, परराष्ट्र धोरण या क्षेत्रातील कामकाजाची मोठी शिदोरी आहे. तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचा अमेरिकेने पाहिलेला एक चांगला उपाध्यक्ष, अशा शब्दांत कौतुक केले होते.

बायडेन यांची कारकिर्द
बायडेन यांनी समलिंगी विवाहाबाबत काहीही हरकत नाही, असे मत नोंदविल्यानंतर गदारोळ माजला होता. तथापि, त्यानंतर काही दिवसांतच ओबामांनी बायडेन यांचे विधान खरे करून दाखवले होते. दीर्घ राजकीय वाटचाल असूनही ओबामांसारख्या कृष्णवर्णीय व्यक्तीसोबत काम करण्याची कृती त्यामुळेच अमेरिकी जीवनात अधिक उठावदार ठरली. बायडेन १९७२ मध्ये डेलवेअरमधून सिनेटवर निवडून आले, त्यानंतर सहा वेळा त्यांनी सिनेटवर येथूनच प्रतिनिधित्व केले. १९८८ मध्ये ते अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत होते. त्यावेळी त्यांनी ब्रिटिश कामगार पक्षाचे नेते नील किनॉक यांच्या भाषणातून वाङ्मय चौर्य केल्याचा आरोप झाला, तो त्यांनी स्वीकारत माघार घेतली होती.

वैयक्तिक आयुष्यातील चढउतार
बायडन यांनी व्यक्तिगत आयुष्यातही अनेक धक्के पचवले आहेत. ते सिनेट सदस्य झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांची पत्नी निलीआ आणि मुलगी नाओमी यांचे मोटार अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांची मुले बिवू आणि हंटर जखमी झाल्याने ते त्यांच्यासोबत रुग्णालयात होते, त्याचवेळी त्यांनी रुग्णालयातून सिनेट सदस्यत्वाची शपथ घेतली होती. बिवूचे सेहेचाळीसाव्या वर्षी मेंदूच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांचा दुसरा मुलगा अमेरिकेच्या राजकारणातला उगवता तारा आहे. हे धक्के पचवले बायडेन त्यामुळेच आरोग्यविषयक सोयीसुविधा, विमा याबाबत राष्ट्रीय धोरणाबाबतही तितकेच आग्रही आहेत. तसं पाहता त्यांचं वय जास्त आहे. आणि अमेरिकेच्या इतिहासातील ते सर्वांत जास्त वयस्कर राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT