cholesterol test 
ग्लोबल

‘कोविड १९’ कडून होतोय आता या यंत्रणेचा वापर?

यूएनआय

चीनमधील ‘एएमएमएस’ चे संशोधन; उपचाराला दिशा मिळण्याची शक्यता
बीजिंग - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘कोविड १९’ विषाणूबद्दल सातत्याने संशोधन सुरू आहे. आता, संशोधकांनी कोरोनाला कारणीभूत ठरणारा ‘सार्स-कोव्ह-२’ हा विषाणू शरीरात पसरण्यासाठी पेशींच्या अंतर्गत कोलेस्टेरॉल यंत्रणेचा वापर करत असल्याचा दावा केला आहे. चीनमधील अकादमी ऑफ मिलट्री सायन्सेस (एएमएमएस)मधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. त्याचे निष्कर्ष ‘नेचर मेटॅबॉलिझम’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या संशोधनामुळे कोलेस्टेरॉल चयापचय आणि ‘कोविड १९’ मधील परस्परसंबंधांवर प्रकाशझोत पडला आहे. ‘सार्स-कोव्ह-२’ हा विषाणू मानवी पेशींच्या टोकाला (रिसेप्टर) चिकटतो. या पेशी एचएडीएल प्रकारच्या कोलेस्टेरॉलला जोडलेल्या असतात. हे कोलेस्टेरॉल चांगले म्हणून ओळखले जाते. संशोधकांनी पेशींमधील कोलेस्टेरॉलला जोडलेले हे टोक बंद केले. त्यानंतर हा विषाणू पेशींशी चिकटू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी या संशोधनाचा मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, हे संशोधन अद्याप अतिशय प्राथमिक स्तरावर आहे. ‘सार्स-कोव्ह-२’ विषाणू संसर्ग पसरविण्यासाठी पेशींच्या अंतर्गत कोलेस्टेलरॉल यंत्रणेचा वापर करतो. संसर्गादरम्यान विषाणू अणकुचीदार प्रथिनांच्या (स्पाईक प्रोटिन) माध्यमातून पेशींवर आक्रमण करतो. त्यातून पेशींच्या ‘एसीई२’ या टोकाला बांधून ठेवतो. 

विषाणू पेशीत कसा पसरतो?
कोरोना संसर्गात या संशोधकांनी दुसऱ्या एका रिसेप्टरची भूमिकाही अधोरेखित केली आहे. एचडीएल स्कॅव्हेंजर रिसेप्टर बी टाईप १ (एसआर-बी१) नावाचा हा रिसेप्टर फुफ्फुसांसह इतरही अनेक पेशींमध्ये आढळतो. तो एचडीएलला बांधून ठेवतो. अणकुचीदार प्रथिन कोलेस्टेरॉलबरोबरच एसआर-बी१ला बांधून ठेवते. यात एचडीएलची उपस्थिती असल्याने ‘एसीई२’शी संबंधित संपूर्ण पेशीला बांधून ठेवण्यात विषाणूला यश येते, असेही संशोधकांना आढळले.

‘स्पाईक प्रोटिन’ म्हणजे काय?
कोरोना विषाणूच्या टोकदार भागावर असल्यामुळे हे प्रोटिन स्पाईक प्रोटिन म्हणून ओळखले जाते. मानवी शरीरातील पेशींशी रेणूंच्या माध्यमातून जोडलेले असल्याने ते संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरते. 

संशोधनाचा काय फायदा?
कोरोना विषाणू पेशीमध्ये पूर्णपणे शिरण्यासाठी पेशीची संपूर्ण यंत्रणेचे एक प्रकारे अपहरण करतो. संशोधकांनी हा मार्ग मोनाक्लोनल प्रतिपिंडे वापरून बंद केला. या संशोधनाचा विशिष्ट प्रकारची औषधे विकसित करण्यासाठी तसेच शरीरातील कोरोनाचा संसर्ग मर्यादित ठेवण्यात फायदा होऊ शकतो. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT