Pink-Diamond-Mine 
ग्लोबल

‘पिंक डायमंड’च्या जगातील सर्वांत मोठ्या खाणीस कुलूप

वृत्तसंस्था

सिडनी - पिंक डायमंडची जगातील सर्वांत मोठी खाण आज कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या खाणीतील सगळी मौल्यवान रत्ने काढून घेण्यात आली असल्याने ती बंद करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत असे खाण उत्खनन क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिओ टिंटोने सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑस्ट्रेलियाच्या पश्‍चिम भागातील किम्बर्ले परिसरामध्ये ही खाण असून आर्गेले असे तिचे नाव आहे. अतिशय दुर्मिळ मानले जाणारे पिंक डायमंड केवळ याच खाणीमध्ये आढळून येत असत. जगातील नव्वद टक्के पिंक डायमंड हे याच खाणीतील असल्याचे बोलले जाते.

एका अँग्लो- ऑस्ट्रेलियन कंपनीने १९७९ मध्ये ही खाण शोधून काढली होती. प्रत्यक्षात येथे खोदकाम सुरू होण्यास मात्र चार वर्षांचा काळ लागला होता. या खाणीतून आतापर्यंत ८६५ दशलक्ष कॅरेटच्या कच्च्या हिऱ्यांचे उत्पादन घेण्यात आले होते. ही खाण बंद करण्याच्या झालेल्या अधिकृत कार्यक्रमास या खाणीत काम केलेले माजी कर्मचारी आणि स्थानिक जमिनींचे मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंद करण्यास पाच वर्षे लागणार
ही खाण ३७ वर्षांची असून ती पूर्णपणे बंद करण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी लागेल असे तज्ञांचे म्हणणे आहे. ही खाण बंद झाल्यानंतर स्थानिकांचे पुनर्वसन करण्यात येईल आणि त्यांना येथील जमिनीचे तुकडे देण्यात येतील, असे येथील खाणीचे व्यवस्थापक अँड्र्यू विल्सन यांनी सांगितले. मागील दोन दशकांमध्ये पिंक डायमंडची किंमत ही पाचशे पटीने वाढली असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पोटच्या मुलीचा गळा दाबून मुलासह आईने विहिरीत मारली उडी, मुलाचा दुर्दैवी अंत

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

प्रतीक्षा संपली! यंदा स्वामी शुक्रवारी नाही गुरुवारीच येणार .. प्रविण तरडेंच्या 'देऊळ बंद २'ची रिलीज डेट समोर; कोण साकारणार मुख्य भूमिका?

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण

Konkan Mango Farmers : कोकणच्या हापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी! राजू शेट्टींच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय, वाशी APMC मधील बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT