mahatma gandhi statue vandalised in canada
mahatma gandhi statue vandalised in canada esakal
ग्लोबल

Mahatma Gandhi Statue: कॅनडात गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना, भारताकडून दुःख व्यक्त, तपास सुरू

सकाळ डिजिटल टीम

कॅनडामधील ओंटारियोतील रिचमंड हिल शहरात असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. या घटनेवर भारताने दुःख व्यक्त केले आहे. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला तोडण्याची घटना घृणास्पद आहे आणि त्याचा तपास सुरु आहे असे कॅनडा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

कॅनडियन ब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशन (सीबीसी) यांनी यॉर्क रीजनल पोलिसांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे. योंग स्ट्रीट अँड गार्डन एवेन्यू येथील विष्णु मंदिरातील गांधीजींच्या पुतळ्याचा अनादर करण्यात आला आहे. (mahatama gandhi statue vandalised in canada)

टोरंटो येथील भारतीय दूतावासाने याबाबतचे ट्विट केले आहे. ‘रिचमंड हिल येथील विष्णु मंदिरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याचा अनादर करण्यात आला त्यामुळे आम्ही खूप दुःखी झालो आहोत. यामुळे कॅनडामधील भारतीय समुदायाच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत. या घृणास्पद घटनेची चौकशी व्हावी यासाठी आम्ही कॅनडातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत' असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ओटावा येथील हाय कमीशनने सांगितले की, भारतीयांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या द्वेषपूर्ण गुन्ह्यामुळे भारताला खूप दुःख झाले आहे.आयोगाने असेही म्हटले आहे की, भारताने तपासासाठी कॅनडा सरकारशी संपर्क साधला आहे आणि दोषींवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हाय कमीशनकडून ट्विटही करण्यात आले आहे की, “भारतीय समुदायाला घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या द्वेषपूर्ण गुन्ह्यामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये चिंता आणि असुरक्षितता वाढेल. आम्ही तपासासाठी कॅनडा सरकारशी संपर्क साधला आहे आणि या घटनेबाबत योग्य तो न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक पोलिसांनी हि घटना घृणास्पद असल्याचे सांगितले. यॉर्क रीजनल पोलिस कॉन्स्टेबल एमी बौद्रेउ यांनी सांगितले की, पुतळ्यावर ग्राफिक शब्दांमधून ‘बलात्कारी’ आणि ‘खालिस्तान’ लिहण्यात आले होते. त्याचबरोबर ‘यॉर्क क्षेत्रीय पोलिस अशा प्रकारचे घृणास्पद गुन्हे सहन करून घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं'.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT