pakistan 
ग्लोबल

पाकिस्तानची नाचक्की! मलेशियानं जप्त केलं प्रवासी असलेलं विमान

सकाळ डिजिटल टीम

क्वाललांपूर - मलेशियाने शुक्रवारी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या बोईंग 777 या प्रवासी विमानाला क्वाललांपूर विमानतळावर जप्त केलं. PIA चे विमान लीजवर देण्यात आले होते आणि त्याची रक्कम देण्यात आली नव्हती. मलेशियाच्या स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार हे विमान जप्त करण्यात आलं आहे. मलेशियाने उचललेलं हे पाऊल आपल्याला मान्य नसल्याचं PIA ने म्हटलं आहे. 

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने 2015 मध्ये एका व्हिएतनामच्या कंपनीकडून बोइंग 777 सह दोन एअरक्राफ्ट भाड्याने घेतले होते. जप्त करण्यात आलेल्या विमानामध्ये प्रवाशीसुद्धा होते. त्यात स्टाफमधील 18 जणांचा समावेश आहे. आता विमान जप्त झाल्यानं प्रवासी क्वाललांपूर इथं अडकले आहे. प्रोटोकॉलनुसार सर्वांना 14 दिवस क्वारंटाइन करण्यात येईल.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने याबाबत ट्विट केलं आहे. त्यात म्हटलं की, पीआयए आणि थर्ड पार्टी यांच्यातील कायदेशीर लढाईमध्ये झालेला हा निर्णय एकतर्फी आहे. सर्व प्रवशांची आम्ही काळजी घेत आहोत. अडकून पडलेल्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. 

PIA 4 अब्ज डॉलर्स तोट्यात असून कोरोनाच्या काळात उड्डाणांवर बंदी असल्यानं अडचणी वाढल्या होत्या. मे महिन्यात जेव्हा विमाने सुरु झाली त्याचवेळी एक दुर्घटना झाली होती. त्यात 97 प्रवाशांचा मृत्यूही जाला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या मंत्र्यांनी म्हटलं होतं की, देशात तीनपैकी एक पायलट खोटा आहे. त्यांच्याकडे बनावट लायसन आहे असाही खळबळजनक दावा केला होता. मंत्र्यांच्या या दाव्यानंतर अनेक देशांनी PIA च्या विमानांवर बंदी घातली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT