man crying remembering his late wife in lockdown got emotional video viral 
ग्लोबल

प्रेमाची ताकद पाहा; डोळ्यात येतील अश्रू...

वृत्तसंस्था

लंडन : प्रेमात प्रचंड ताकद असते, असे म्हटले जाते. पत्नीवर असलेल्या प्रेमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामध्ये आजोबांनी आपल्या मृत पत्नीचा फोटो पाहून ढसाढसा रडताना दिसत आहेत.

केन बेंबो (वय 94) असे या आजोबांचे नाव आहे. लॉकडाऊनमध्ये असलेले केन आपल्या पत्नीच्या आठवणीत रडताना दिसत आहेत. केन यांना सध्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या लॉजच्या वतीने हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला, "आम्हाला माहित आहे येथे राहणार लोक आपल्या लोकांच्या आठवणीत व्याकुळ झाले आहेत. पण आपण त्यांना नाही विसरत जे आपल्यासोबत नाहीत. आज आमच्या एका सहकाऱ्याने केन यांनी एक खास गिफ्ट दिले. या उशीवर त्यांच्या पत्नीचा फोटो आहे. हा फोटो पाहून केन भावूक झाले", असे शीर्षक दिले आहे.

लॉजच्या सहकाऱ्याने केन यांना ही उशी दिल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. केन यांना पाहून लॉजमधील कर्मचारी त्यांना मिठी मारून रडू लागले. नऊ महिन्यांपूर्वी केन यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. पत्नीचा फोटो त्यांच्यासोबत असतो. म्हणून त्यांना पत्नीचे छायाचित्र असलेली उशी भेट म्हणून देण्यात आली, असे वृत्त 'डेली मेल'ने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Prices: 253 दिवस... 6,072 तास... सोन्याच्या भावात 34,050 रुपयांची वाढ; दिवाळी पर्यंत किती वाढणार सोनं?

Latest Marathi News Updates : अक्कलकोटमधील वागदरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

Billionaires List : इलॉन मस्कला टाकले मागे, ८१ व्या वर्षी बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत लॅरी एलिसन?

Javelin Throw Competition; अहिल्यानगरच्या शिवमने मोडला ‘गोल्डन बॉय’ नीरजचा विक्रम; भालाफेकमध्ये ८४.३१ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

IMD Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 'या' तारखेला परतीचा मान्सून धडकणार, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT