Viral Video
Viral Video Esakal
ग्लोबल

गुंडांना बोलावले, बंदूक काढली... प्रियकराने प्रेयसीला अजब पद्धतीने केलं प्रपोज; पाहा VIDEO

अंकिता खाणे (Ankita Khane)

सोशल मीडियावर आपल्या प्रेयसीला प्रपोज केल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, पण असा व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल. लोक त्यांच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला फुले किंवा अंगठी देऊन प्रपोज करतात. मात्र, या एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीला पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने प्रपोज केले. प्रपोज करण्याच्या या पद्धतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रपोजलचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. दरम्यान, हे प्रकरण कोलंबियाचे आहे.(Latest Marathi News)

येथे एका व्यक्तीने आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी दरोडा टाकण्याचे नाटक केले. त्याने गुंडांना बोलावले, ज्यांनी त्यांच्यासोबत शस्त्रे आणली होती. त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शनिवारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये लाल रंगाची कार दिसत आहे. तेवढ्यात दुचाकीवरून दोन जण खाली उतरले. एक व्यक्ती गाडीकडे धावत येतो.

प्रपोज करणारा कारमध्ये त्याच्या मैत्रिणीसोबत बसलेला होता. हे तिघे येतात आणि त्यांना शस्त्रे दाखवतात आणि गाडीतून उतरायला सांगतात. तेवढ्यात दुसरी बाईक येते आणि त्यावरून दोन जण खाली उतरतात. हे सर्वजण त्या प्रेयसीला आणि त्या प्रियकराला गाडीतून बाहेर काढतात. या वेळी प्रेयसी खूप घाबरते. (Marathi Tajya Batmya)

त्याचवेळी प्रियकर खिशातून अंगठी काढतो आणि तिला प्रपोज करतो. तेव्हा तिच्या लक्षात येते की, हा खोटा दरोडा आहे आणि तिच्या प्रियकराने हे केले आहे. ती रागावते आणि त्याला मारते. मग ती अंगठी घालते. यानंतर दोघे किस करू लागतात. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या बनावट गुंडांनी या जोडप्यासाठी टाळ्या वाजवल्या. लोक या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा कोणी आपल्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला अनोख्या पद्धतीने प्रपोज केले असेल. याआधीही अशी प्रकरणे समोर आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT